ट्रकमधील आॅईल चोरी प्रकरणातील आरोपी पारोळा पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 01:57 PM2017-12-05T13:57:54+5:302017-12-05T14:01:23+5:30
पारोळा येथे उभ्या ट्रकमधून चार लाखाचे आॅइल चोरणाºया टोळीला गुजराथ पोलिसांनी केली होती अटक
आॅनलाईन लोकमत
पारोळा,दि.५ पारोळा येथील राष्ट्रीय महामार्गावरील एका पेट्रोल पंपावर रात्री उभ्या असलेल्या ट्रकमधून सुमारे चार लाखांचे आॅईल चोरी केल्याप्रकरणी पारोळा पोलिसांनी गुजराथ पोलिसांकडून आरोपी व मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. पारोळा पोलीसात याप्रकरणी गुन्हा दाखल होता.
सेल्वास (गुजरात) येथून सविता आॅईल टेक्नोलॉजी प्रा.लि. या कपनीतून सरसोल कंपनीचे,महिंद्रा मॅक्स चे आॅइल घेऊन पश्चिम बंगाल मधील कलकत्ता येथे ६८७ बॉक्स भरून निघाला होता. १५ रोजी रात्री एक वाजता पारोळा तालुक्यातील दळवेल येथील गुडलक पेट्रोल पंपावर गाडीत डिजेल भरण्यासाठी थांबला होता. यावेळी चालक भैरु यादव हा गाडीमध्ये झोपला होता. या दरम्यान रात्री अज्ञात चोरट्यांनी ताड़पत्री कापून गाडीतील आॅइलचे २३६ बॉक्स गायब केले होते. तीन लाख ९८ हजार ५८० रुपये किमतीचा हा ऐवज होता. सकाळी ही बाब उघड झाली.
गुजरात येथील बड़ोदा पोलिसांच्या कारवाईत काही चोरट्यांनी पारोळा येथे चोरीची कबुली दिल्याने ही चोरी उघडकीस आली होती. आॅईल चोरीसाठी ज्या वाहनाचा वापर चोरट्यांनी केला ते वाहन देखील चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. मंगळवारी चोरीला गेलेले आॅईल व ट्रक पारोळा पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणले. तपास पोलिस निरीक्षक एकनाथ पाडळे हे करीत आहेत.