पारोळा शेतकरी संघावर शिवसेनेचे तर भुसावळात भाजपाचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 04:04 PM2017-11-27T16:04:46+5:302017-11-27T16:27:21+5:30

पारोळ्यात माजी चिमणराव पाटील यांचा सर्व १५ जागांवर विजय तर भुसावळात आमदार संजय सावकारे यांच्या पॅनलला आठ जागा

in parola shivsena and in bhusaval bjps victory | पारोळा शेतकरी संघावर शिवसेनेचे तर भुसावळात भाजपाचे वर्चस्व

पारोळा शेतकरी संघावर शिवसेनेचे तर भुसावळात भाजपाचे वर्चस्व

Next
ठळक मुद्देपारोळ्यात माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या पॅनलला १५ जागांवर विजयपारोळ्यात विद्यमान आमदार, खासदार, नगराध्यक्षांच्या पॅनलचा पराभवभुसावळात भाजपाला आठ तर राष्ट्रवादीला सात जागांवर विजय

आॅनलाईन लोकमत
पारोळा ,दि.२७ - पारोळा तालुका शेतकरी संघाच्या निवडणुकीत माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या शिवसेनेच्या शेतकरी पॅनलने संपूर्ण १५ जागांवर विजय मिळवित आमदार डॉ.सतीश पाटीलखासदार ए.टी.पाटील यांच्या पॅनलचा धुव्वा उडविला. तर भुसावळात भाजपाचे आमदार संजय सावकारे यांच्या गटाला आठ तर माजी आमदार संतोष चौधरी यांच्या गटाला ७ जागा मिळाल्या.
पारोळा तालुका शेतकी संघ मतदार संघ नुसार विजयी उमेदवार व कंसात त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे : व्यक्तिश: मतदार संघ: आधार काशीनाथ पाटील ( २८४६) गणेश सीताराम पाटील (२७७०), चेतन सुरेश पाटील ( २९५३), भिकन फकिरा महाजन, (२९४४ ), संस्था मतदार संघ : सखाराम श्रावण चौधरी (५४) अरुण दामू पाटील (६२ ) राजेंद्र सुकदेव पाटील (५६ ), वर्षा शरद पाटील (५३), सुधाकर दौलतराव पाटील (६०), भदाणे मधुकर ज्योतिराम (५१). महिला राखीव मतदार संघ : भारती राजेंद्र पाटील (३२०२), रत्नाबाई हिंमत पाटील ( ३१४०). इतर मागासवर्गीय मतदार संघ : भानुदास भीमराव पाटील (३२७५), अनुसूचित जाती जमाती : संदनशिव सुभाष बळीराम ( ३३३२ ). विशेष मागासवर्गीय : पोपट भिका चव्हाण ( ३३३४).
भुसावळात भाजपाचे वर्चस्व
भुसावळ शेतकी संघाच्या निवडणुकीचे निकाल घोषित झाले. त्यात भाजपा आमदार संजय सावकारे यांच्या पॅनलला आठ जागा तर माजी आमदार संतोष चौधरी व जि.प.चे माजी अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या पॅनलला सात जागा मिळाल्या आहेत.

Web Title: in parola shivsena and in bhusaval bjps victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.