महाआवास अभियानात पारोळ्याची आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:12 AM2021-06-17T04:12:12+5:302021-06-17T04:12:12+5:30
या कार्यक्रमात आमदार चिमणराव पाटील, सभापती रेखाबाई, उपसभापती अशोक पाटील, पं. स. सदस्य प्रमोद जाधव, गटविकास अधिकारी ...
या कार्यक्रमात आमदार चिमणराव पाटील, सभापती रेखाबाई, उपसभापती अशोक पाटील, पं. स. सदस्य प्रमोद जाधव, गटविकास अधिकारी बी. एन. पाटील, सहायक गटविकास अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तालुक्यात अशोक सखाराम महाजन, (शिरसोदे), सुभाबाई देवराम पाटील ( म्हसवे), बाबुलाल नरसिंग पाटील (टोळी ), धनराज हिलाल पाटील (शिरसोदे ), विठ्ठल किसन पाटील ( मोहाडी यांना घराची चावी देऊन त्यांना घराचा ताबा देण्यात आला.
तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ४ हजार ६३५, तर राज्य पुरस्कृत (रमाई, शबरी, पारधी) योजनेंतर्गत ७७७ लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. या सर्व लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे १०० टक्के वितरण करण्यात आले आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतील २ हजार ५२१, तर राज्य पुरस्कृत योजनेतील ४४५ घरकुले पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रलंबित घरकुलांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. तालुक्यातील पंचायत समितीच्या आवारात डेमो हाऊस बांधकाम पूर्ण झाले आहे, तर ४ घरकुल मार्ट सुरू करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी एन. आर. पाटील यांनी दिली.
महाआवास अभियानअंतर्गत जिल्ह्यात पंचायत समिती पारोळाने प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल आमदार चिमणराव पाटील यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती सभापती, उपसभापती, पं. स. सदस्य व घरकुल टीम, निकिता देसले, संदीप सोनवणे, कमलेश लोहार, सर्व ग्रामीण अभियंता यांचे अभिनंदन व कौतुक केले.