अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी धावले पारोळ्याचे आमदार डॉ.सतीश पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 05:29 PM2017-12-27T17:29:07+5:302017-12-27T17:33:03+5:30

म्हसवे गावाजवळ बुधवारी दुपारी १ वाजता एका चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक देत भरधाव वेगाने निघून गेला. अपघातग्रस्त दादाभाऊ लोटन पाटील (रा.सारवे) हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना आमदार डॉ.सतीश पाटील यांनी त्यांना आपल्या वाहनात बसवित तत्काळ रुग्णालयात दाखल केले

Parole MLA Santosh Patil ran for help in the accident | अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी धावले पारोळ्याचे आमदार डॉ.सतीश पाटील

अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी धावले पारोळ्याचे आमदार डॉ.सतीश पाटील

Next
ठळक मुद्देम्हसवे गावाजवळ झाला अपघातआमदारांनी केली जखमीला मदतजखमीला पुढील उपचारासाठी केले धुळ्याला रवाना

आॅनलाईन लोकमत
पारोळा, दि.२७ : तालुक्यातील म्हसवे गावाजवळ बुधवारी दुपारी १ वाजता एका चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक देत भरधाव वेगाने निघून गेला. अपघातग्रस्त दादाभाऊ लोटन पाटील (रा.सारवे) हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना आमदार डॉ.सतीश पाटील यांनी त्यांना आपल्या वाहनात बसवित तत्काळ रुग्णालयात दाखल केले.
आमदार डॉ सतीश पाटील बुधवारी दुपारी १ वाजता जळगाव येथे जात असताना म्हसवे गावाजवळ हा अपघात झाला. आमदार पाटील यांनी तात्काळ स्वत: मदत करीत जखमी दादाभाऊ यास स्वत:च्या गाडीत टाकले. वाहनाने त्याला पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातग्रस्तावर उपचार सुरु असेपर्यंत ते थांबले. रुग्णवाहिकेद्वारे जखमीला पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले. त्यानंतर आमदार डॉ.पाटील हे जळगावकडे रवाना झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अपघातग्रस्ताला मदत करीत आमदारांनी तत्काळ मदत उपलब्ध करून देत माणुसकीचे दर्शन घडविले.

Web Title: Parole MLA Santosh Patil ran for help in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.