पारोळ्याजवळ लक्झरी उलटून १ ठार २५ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 06:41 AM2019-06-08T06:41:17+5:302019-06-08T06:41:44+5:30
या लक्सरी बसचा चालक हा जळगाव येथून बदलीचा चालक म्हणून बसला होता. त्याने मद्यप्राशन केल्याचे प्रवाश्यांनी सांगितले. करंजी गाव जवळ भरधाव वेगाने बस चालवित होता.
पारोळा : मुंबई-भुसावळ या मार्गावर धावणारी लक्झरी शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास उलटून झालेल्या अपघातात एक महिला ठार तर २५ प्रवासी जखमी झाल्याची घटना झाली. चालकाचे लक्झरीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. भुसावळ वरून मुंबई साठी अंकल इंडिकेट लक्झरी एम पी ३० पी ०२७३ प्रवाशी घेऊन निघाली. पारोळा धुळे आशिया महामार्गावर पारोळा पासून ७ किमी अंतरावर करंजी गावाच्या फाट्या जवळील वळणावर हॉटेल सयोग जवळ ही बस पलटी झाली. सिमा भिकन सूर्यवंशी (४०) रा ठाणे ही जागीच ठार झाली. तर ४८ प्रवाशी पैकी २५ जण जखमी झाले. यात काही प्रवाशी यांची प्रकृती चिंताजनक आहे.
या लक्सरी बसचा चालक हा जळगाव येथून बदलीचा चालक म्हणून बसला होता. त्याने मद्यप्राशन केल्याचे प्रवाश्यांनी सांगितले. करंजी गाव जवळ भरधाव वेगाने बस चालवित होता. त्याच्याकडून बस नियंत्रीत झाली नाही आणि बस रस्त्याच्या उजव्या बाजूला खड्डयात पडली. दोन तीन पलटी घेत जाऊन पडली. यामुळे लक्सरी बसचा पूर्ण चेंदामेंदा झाला. घटनास्थळी प्रवाशांच्या साहित्याचा खच पडला होता. जखमींना कुटीर रुग्णालयात दाखल केले. डॉ.योगेश साळुंखे, डॉ धनंजय पाटील, डॉ.सुनील पारोचे, सचिन बडगुजर, डॉ योगेंद्र पवार यांनी उपचार केले. यावेळी ईश्वर ठाकूर, रोशन पाटील, दीपक सोनार, राजू वानखेडे, अजय घटायडे यांनी मदत कार्य केले.
अपघातात २५ प्रवासी जखमी
अपघातात धीरेंद्र पाटील (जळगाव), भिकन खंडू सूर्यवंशी (ठाणे), रोशन भिकन सूर्यवंशी (ठाणे) वेदु पाटील (७ महिने) सोदु पाटील, मनोहर विनायक पाटील (कल्याण), एकनाथ पाटील (एरंडोल), अन्वर देशमुख (नशिराबाद), यश विजय बोरसे, विजय बन्सी बोरसे (धरणगाव) मोहमद साधू पटेल, मोईन पटेल, अस्लाम पटेल सर्व रा (जळगांव) यांच्यासह जखमींचा समावेश आहे.