‘आयआयटी’च्या ‘गेट’परीक्षेतही पार्थ यादवला विशेष फेलोशिप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:16 AM2021-03-31T04:16:55+5:302021-03-31T04:16:55+5:30
जळगाव : हैदराबाद येथील ‘फॉरिन लँग्वेज युनिव्हर्सिटी’तून इंग्रजी या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या पार्थ चंद्रकांत यादव याने ...
जळगाव : हैदराबाद येथील ‘फॉरिन लँग्वेज युनिव्हर्सिटी’तून इंग्रजी या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या पार्थ चंद्रकांत यादव याने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ‘नेट’ परीक्षेपाठोपाठ मुंबई ‘आयआयटी’च्या ‘गेट’ परीक्षेतही विशेष प्रावीण्यासह फेलोशिप प्राप्त केली आहे.
निगेटिव्ह (मायनस) मार्क्स सिस्टीम असलेल्या या परीक्षेचा शिष्यवृत्ती निकाल ४१ वर बंद झाला असून, पार्थ यादवचा स्कोअर ६० राहिला. ‘नेट’ परीक्षेत पार्थने ९९.७५ पर्सेंटाईल मिळविले होते. पार्थ सध्या हैदराबाद येथील ‘फॉरिन लँग्वेज युनिव्हर्सिटी’तून इंग्रजी या विषयात पदव्युत्तर शिक्षणाच्या दुसऱ्या वर्षाला आहे. त्याला विशेष संशोधनासाठी आधीच ‘नेट’च्या माध्यमातून ‘रिसर्च फेलोशिप’ जाहीर झालेली आहे. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होताच ‘आयआयटी’मधून संशोधन प्रकल्प पूर्ण करणार आहे, असे पार्थने सांगितले. तो चंद्रकांत यादव, बांभोरी इंजिनिअरिंग कॉलेज स्टाफ राजश्री पाटील-यादव यांचा मुलगा आहे.