सामाजिक बांधिलकी म्हणून वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2017 03:49 PM2017-06-29T15:49:36+5:302017-06-29T15:49:36+5:30
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी घेतला आढावा
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि:29- पर्यावरणाचे महत्व लक्षात घेऊन 4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात उद्दिष्टय़पूर्तीसाठी नव्हे तर सामाजिक बांधिलकीच्या भावनेने सर्वांनी सहभागी होऊन जिल्ह्यात ही मोहिम यशस्वी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले.
चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमातंर्गत जिल्हयात सुरु असलेल्या तयारीचा आढावा जिल्हाधिका:यांनी गुरुवारी घेतला. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, वन विभागाचे जळगाव येथील उप वनसंरक्षक अधिकारी आदर्श रेड्डी, यावल विभागाचे उपवनसंरक्षक एस. एस. दहिवले, उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संतोष पाटील, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
राज्यात आगामी तीन वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत यावर्षी 4 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यासाठी जळगाव जिल्हयाला 20 लाख 89 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. यामध्ये ग्रामपंचायतींना 4.31 लाखाचे उद्दिष्ट देण्यात आले असून प्रत्यक्षात 4.48 लाख वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. तर वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागास 14.40 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले असून त्यांनी 17.15 लाख वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. तर इतर विभागांनी 2.3 लाख वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. जिल्हाभरात वृक्ष लागवडीसाठी 23 लाख 66 हजार 993 खड्डे तयार असल्याची माहिती वनविभागातर्फे देण्यात आली.