जळगावात शेतकरी आंदोलनाला पाठिंब्यासाठी १२ संघटनांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:13 AM2020-12-08T04:13:51+5:302020-12-08T04:13:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या कृषी कायद्याविरोधात मंगळवारी विविध कृषी संघटनांनी भारत बंदची हाक दिली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या कृषी कायद्याविरोधात मंगळवारी विविध कृषी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने देखील पाठिंबा दिला आहे. तसेच या तिन्ही पक्षाशी संलग्नित विविध संघटनांसह १२ संघटना देखील सहभागी होणार आहेत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी यांनी दिली आहे.
कृषी कायद्याविरोधात शेतकºयांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आता या आंदोलनाची तीव्रता वाढत जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे जवळपास २ कोटींचे व्यवहार मंगळवारी ठप्प राहणार आहेत. भाजीपाला मार्केटसह धान्य मार्केट देखील बंद राहणार आहे. कोणतीही खरेदी किंवा विक्री होणार नसल्याची माहिती सभापतींनी दिली आहे. यासह जळगाव तालुक्यातील अनेक जिनींग व सीसीआयचे केंद्र देखील बंद ठेवण्यात येणार असल्याचेही सभापती चौधरी यांनी सांगितले.
शासकीय खरेदी राहणार सुरु
कृषी उत्पन्न बाजार समिती जरी बंद राहणार असली तरी इतर शासकीय खरेदी केंद्र सुरु राहणार आहेत. पणन चे केंद्र देखील सुरु राहणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक एस.एस.बिडवई यांनी दिली. दरम्यान, काही शेतकरी संघटनांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केली नसली तरी कर्मचाºयांनी संपात सहभागी घेतल्यास शासकीय खरेदी केंद्र ऐनवेळी बंद ठेवावी लागणार आहेत अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
कोट..
शेतकºयांचा मालाची खरेदी करणारे सर्र्व शासकीय खरेदी केंद्र सुरु राहतील. एक दिवस बंद केले तरी शेतकºयांचे नुकसान होवून जाईल. त्यामुळे शेतकरी हिताच्या दृष्टीने खरेदी केंद्र सुरु ठेवावी लागतील.
-अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी