पार्वती नगरात कारच्या काचा फोडल्या
By admin | Published: January 5, 2017 12:38 AM2017-01-05T00:38:13+5:302017-01-05T00:38:13+5:30
जळगाव : शहरात वाहनांच्या काचा फोडण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. तीन ते चार महिन्यांनी असे प्रकार घडत आहेत.
जळगाव : शहरात वाहनांच्या काचा फोडण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. तीन ते चार महिन्यांनी असे प्रकार घडत आहेत. मंगळवारी रात्रीही गिरणा टाकी परिसरातील पार्वती नगरात संदीप गोविंदराव जाधव यांच्या मालकीच्या कारच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. याप्रकरणी जाधव यांनी पोलीस स्टेशन गाठून निरीक्षक प्रवीण वाडिले यांना झाल्या प्रकाराची माहिती दिली.
जाधव यांच्याकडे इंडीगो कार (क्र.एम.एच.०२ ए.क्यू.२९५५) आहे. ही कार ते घरासमोरील मैदानात पार्कींग करतात. नेहमीप्रमाणे मंगळवारीही रात्री त्यांनी कार त्याच जागेवर लावली होती. सकाळी साडे सहा वाजता त्यांच्या शेजारी राहणाºया व नातेवाईक असलेल्या मिना भोसले यांना कारची मागील काच फुटलेली दिसली. त्यांनी हा प्रकार जाधव यांना सांगितला. कारची पाहणी केली असता मोठ्या दगडाने ही काच फोडण्यात आली होती व तो दगड आत सीटवर पडलेला होता. चोरी करण्याच्या उद्देशाने काच फोडली की, विकृत असलेल्या व्यक्तीने ही काच फोडली हे स्पष्ट होवू शकले नाही. कोणाशीच वाद नसल्याने द्वेषातून हे कृत्य केल्याचीही शक्यता नाही.
जाधव यांनी सकाळी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून निरीक्षक प्रवीण वाडिले यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर सहायक फौजदार गोपाळ चौधरी व सहकाºयांनी घटनास्थळाची पाहणी करुन सीसीटीव्ही फुटेज तपासले. गेल्या वर्षी मोहाडी रोड, दौलत नगर, नेहरु नगर, यशवंत कॉलनी व ओंकारेश्वर मंदिर परिसरात एकाच वेळी कारच्या काचा फोडण्यात आल्या होत्या.