फिरासत फातेमा सेट परीक्षा उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:15 AM2021-04-19T04:15:02+5:302021-04-19T04:15:02+5:30
डॉ. प्रदीप सुरवाडकर यांची निवड जळगाव : माणुसकी सोशल फाऊंडेशन संचालित ग्राहक संरक्षणतर्फे ग्राहक संरक्षण समितीच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी डॉ. ...
डॉ. प्रदीप सुरवाडकर यांची निवड
जळगाव : माणुसकी सोशल फाऊंडेशन संचालित ग्राहक संरक्षणतर्फे ग्राहक संरक्षण समितीच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी डॉ. प्रदीप सुरवाडकर यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे, उपाध्यक्ष संदीप जाधव, महासचिव राजेश जाधव यांनी ही निवड केली आहे. डॉ. सुरवाडकर हे वरणगाव येथे उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत आहेत.
बिबानगर येथे वारंवार वीजपुरवठा खंडित
जळगाव : शहरातील सावखेडा शिवारातील बिबानगर येथे गेल्या आठवड्यापासून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडत आहे. रविवारीही सकाळपासूनच वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरण तर्फे अचानक वीज पुरवठ्याबाबत कुठलीही कल्पना देण्यात येत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.
शिरसोली येथे कमी दाबाने वीजपुरवठा
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून शिरसोली गावात अनेक ठिकाणी कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याचा प्रकार घडत आहे. यामुळे घरातील उपकरणे पूर्ण क्षमतेने चालत नसल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, चिंचपुरा भागासाठी एकच डीपी असल्याने कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष देऊन तातडीने नवीन डीपी बसविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.