वाहकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशाला कागदपत्रे मिळाली परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:15 AM2021-03-15T04:15:59+5:302021-03-15T04:15:59+5:30

प्रवासी किशोर पाठक हे रविवारी सुरतहून महामंडळाच्या बसने जळगावकडे येत होते. यावेळी ते जळगावला न येता, एरंडोललाच उतरले. मात्र, ...

The passenger got the documents back due to the carrier's circumstance | वाहकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशाला कागदपत्रे मिळाली परत

वाहकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशाला कागदपत्रे मिळाली परत

googlenewsNext

प्रवासी किशोर पाठक हे रविवारी सुरतहून महामंडळाच्या बसने जळगावकडे येत होते. यावेळी ते जळगावला न येता, एरंडोललाच उतरले. मात्र, उतरताना जवळील कागदपत्रांची पिशवी गाडीतच विसरून गेले. पुढे जळगावकडे बस मार्गस्थ झाल्यावर, बसवरील वाहक उमेश बावीस्कर यांना एका बाकावर एक पिशवी पडलेली दिसून आली. या पिशवीत संबंधित व्यक्तीची महत्त्वाची कागदपत्रे व रोख रक्कम आढळून आली. यावेळी उमेश बावीस्कर यांनी संबंधितास संपर्क करण्यासाठी या कागदपत्रांची तपासणी केली असता, एका कागदावर मोबाईल नंबर दिसून आला. या नंबरवर यांनी संपर्क साधून या प्रकाराबाबत कल्पना दिली. तसेच बसमध्ये पिशवी विसलेल्या किशोर पाठक यांचा दूरध्वनी मिळवून पाठक यानांही विसरलेली पिशवी सुरक्षित असल्याचे सांगितले. तसेच पिशवी घेण्यासाठी जळगाव आगारात बोलाविले.

इन्फो :

वाहकाचा आगार व्यवस्थापकांनी केला सत्कार

महत्त्वाच्या कागदपत्रांची पिशवी बसमध्ये विसरल्यामुळे किशोर पाठक हे चिंतातूर झाले होते. मात्र, उमेश बावीस्कर यांनी पाठक यांना त्यांची विसरलेली पिशवी आपल्याकडे सुरक्षित असल्याचे सांगितल्यावर किशोर पाठक यांना आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यांनी लागलीच पिशवी घेण्यासाठी जळगाव गाठले. यावेळी आगार व्यवस्थापक निलेश पाटील यांच्या हस्ते कागदपत्रांची पिशवी परत देण्यात आली. दरम्यान, उमेश बावीस्कर यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे नीलेश पाटील यांच्यासह महाराष्ट्र एसटी कामगार सेनेतर्फे गोपाळ पाटील यांनी सत्कार केला.

Web Title: The passenger got the documents back due to the carrier's circumstance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.