इंधन भरण्यासाठी आलेल्या वाहनधारकांचे पासेस् होणार पंपवर जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 12:32 PM2020-03-27T12:32:23+5:302020-03-27T12:32:52+5:30
गैरवापर रोखण्यासाठी इंधन विक्रीच्या आदेशात सुधारणा
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनाच इंधन मिळण्याची सूट देण्यात आली असली तरी इंधनचा मोठ्या प्रमाणात वापर सुरूच असल्याने याला बसण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी २६ रोजी सुधारीत आदेश काढले आहेत. त्यानुसार अत्यावश्यक सेवा देणाºया अस्थापना, संस्था, कार्यालयांनाच संबंधित कर्मचाºयांना पासेस् द्याव्या लागणार असून या पासेस् पेट्रोल पंपावर जमा करण्यात येणार आहे.
राज्यात संचारबंदी लागू असताना नागरिकांची गर्दी कमी होत नसल्याने जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल-डिझेल खरेदीवर निर्बंध घालण्यात येऊन केवळ अत्यावश्यक सेवा देणाºयांनाच इंधन मिळणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी २४ मार्च रोजी काढले होते. त्यामध्ये जळगाव शहर महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील व शहरांच्या तीन किलो मीटर परिसरातील सर्व पेट्रोल, डिझेल पंप हे सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आले.केवळ अत्यावश्यक सेवा आणि सेवा देणाºयांसाठीच पेट्रोल-डिझेल मिळेल व त्यासाठी वेळेच्या मर्यादाही आखून देण्यात आल्या. त्यानुसार हे पेट्रोल पंप सकाळी ७ ते १० तसेच दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहतील असे आदेश दिले होते.
मात्र अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेक जण इंधन घेऊ लागले. त्यामुळे २४ मार्चच्या आदेशात सुधारणा करीत २६ रोजी सुधारीत आदेश देण्यात आले. त्यानुसार अत्यावश्यक सेवा देणाºयां संस्थां, औषधी विक्रीची दुकाने, किराणा दुकान, दूध संघ व दूध केंद्र यांनीच त्यांच्या कर्मचाºयांना पासेस् द्यावेत. तसेच शासकीय कर्मचाºयांना त्यांच्या प्रमुखांनी व महावितरण, मनपाच्या मक्तेदारांनी त्यांच्या कर्मचाºयांना पासेस् द्याव्या, असे आदेशात म्हटले आहे. तसेच याचा नमुनाच देण्यात आला असून त्यात वाहन क्रमांक द्यावा लागणार असून तारीखचा उल्लेख करून त्या दिवशी किती इंधन लागणार आहे, याचा उल्लेखही पासवर करावा लागणार आहे.
या पासेस् पेट्रोलपंपावर जमा कराव्यात व त्याची नोंद ठेवावी, असेही आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहे.
या सोबतच जिल्हास्तरावरील प्रसार माध्यम प्रतिनिधींना जिल्हा माहिती अधिकाºयांकडून पासेस् घ्याव्या लागणार असून तालुकास्तरावर माध्यम प्रतिनिधींना तहसीलदार पासेस् देणार आहे.