सूचना न देता गाडी रद्द झाल्याने प्रवासी संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:20 AM2021-07-07T04:20:11+5:302021-07-07T04:20:11+5:30
रेल्वे प्रशासन कधी विशेष गाड्यांच्या फेरी वाढवल्या जातात तर कधी अचानक गाड्या रद्द केल्या जातात. या सावळ्या गोंधळामुळे प्रवाशांची ...
रेल्वे प्रशासन कधी विशेष गाड्यांच्या फेरी वाढवल्या जातात तर कधी अचानक गाड्या रद्द केल्या जातात. या सावळ्या गोंधळामुळे प्रवाशांची मात्र गैरसोय होत आहे. विदर्भासह खान्देशला गुजरातला जोडणारी गाडी क्रमांक ०९१२६ अमरावती सुरत या गाडीची भुसावळ स्थानकावर सोमवारी ५ रोजी येण्याची वेळ दुपारी १:१५ ची असताना ती असताना अचानक या गाडीचे अनेक प्रवाशांनी कन्फर्म रिझर्वेशन तिकीट आधीच ऑनलाइन बुक केले होते, स्थानकावर आल्यानंतर गाडी कुठल्या फलाटावर येणार याची चौकशी केली असता गाडी रद्द झाल्याचे समजले. या संदर्भात कोणतीही पूर्व सूचना नसल्याने प्रवासासाठी तयारी करून फलाटावर आलेल्या प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. तर काही जणांनी संताप व्यक्त केला. या गाडीने गुजरातला जाणारे अनेक प्रवासी स्थानकावर आल्यानंतर हा प्रकार समजल्याने प्रवाशांचा मोठा संताप झाला यापुढे तरी रेल्वे प्रशासनाने कुठली गाडी रद्द होणार असली तरी प्रवाशांना रद्द झाल्याचा संदेश पाठवणे आवश्यक आहे.
भुसावळ : पश्चिम रेल्वेकडून धावणारी गाडी क्रमांक ०९१२६ अमरावती सुरत ही गाडी अचानक रद्द करण्यात आली याबाबत प्रवाशांना कुठलाही संदेश न मिळाल्याने वेळेवर स्थानकावर आल्यानंतर गाडी रद्द झाल्याचे समजल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले व तितकाच संताप अनेकांनी व्यक्त केला.
रेल्वे प्रशासन कधी विशेष गाड्यांच्या फेरी वाढवल्या जातात तर कधी अचानक गाड्या रद्द केल्या जातात. या सावळ्या गोंधळामुळे प्रवाशांची मात्र गैरसोय होत आहे. विदर्भासह खान्देशला गुजरातला जोडणारी गाडी क्रमांक ०९१२६ अमरावती सुरत या गाडीची भुसावळ स्थानकावर सोमवारी ५ रोजी येण्याची वेळ दुपारी १:१५ ची असताना ती असताना अचानक या गाडीचे अनेक प्रवाशांनी कन्फर्म रिझर्वेशन तिकीट आधीच ऑनलाइन बुक केले होते, स्थानकावर आल्यानंतर गाडी कुठल्या फलाटावर येणार याची चौकशी केली असता गाडी रद्द झाल्याचे समजले. या संदर्भात कोणतीही पूर्वसूचना नसल्याने प्रवासासाठी तयारी करून फलाटावर आलेल्या प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. तर काही जणांनी संताप व्यक्त केला. या गाडीने गुजरातला जाणारे अनेक प्रवासी स्थानकावर आल्यानंतर हा प्रकार समजल्याने प्रवाशांचा मोठा संताप झाला तर काहींनी तक्रार केली.