तिकीट मशीन वेळेवर न मिळाल्याने प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 12:32 AM2017-10-02T00:32:19+5:302017-10-02T00:33:48+5:30
पाचोरा येथे प्रवासी संतप्त, कारवाईची मागणी
लोकमत ऑनलाईन पाचोरा, जि.जळगाव, दि. 1 : पाचोरा आगारात इश्यू क्लार्कमार्फत तिकीट वाटप मशीन वेळेवर न मिळाल्याने बसेस रविवारी सकाळी आठ वाजेर्पयत खोळंबून होत्या. परिणामी प्रवाशांचे हाल झाले. यामुळे प्रवाशांनी प्रचंड संताप व्यक्त करीत आगार व्यवस्थापनाच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रवास करताना प्रवाशाला एका विशिष्ट मशिनद्वारे वाहक तिकीट देत असतात. हे मशीन आगारात इश्यू क्लार्क (तिकीट मशीन वाटप करणारे) मार्फत वाहकांना उपलब्ध करून देण्यात येते. नंतरच वाहक बसेस पुढील प्रवासासाठी रवाना करतात. पहाटेपासूनच हे तिकीट मशीन देण्यात येते. इश्यू क्लार्क विनोद पवार गैरहजर होते. त्यामुळे सकाळी डय़ूटीवर आलेल्या वाहक-चालकांना मशीन मिळाले नाही. बसेस ताटकळत उभ्या होत्या. प्रवाशी ओरड करीत होते. आगाराचे प्रभारी व्यवस्थापक अनिल बेहरे यांनी इश्यू क्लार्कची जबाबदारी एका कंडक्टरवर सोपविली. नंतर कंडक्टर कपिल पाटील यांनी 8 वाजेपासून मशीन वाटप करीत गाडय़ा रवाना केल्या. यामुळे पहाटेपासून आलेल्या प्रवाशांना सकाळी आठर्पयत ताटकळत थांबावे लागले. अनेक बसेस उशिरा धावण्याच्या प्रकारामुळे पाचोरा आगाराचे हजारो रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. प्रवाशांच्या भावनांशी खेळणा:या या आगारातील अधिकारी व कर्मचा:यांवर वरिष्ठांनी कारवाई करावी, अशी मागणी त्रस्त प्रवाशांनी केली आहे.