भुसावळ-मुंबई पॅसेंजर रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल
By admin | Published: May 2, 2017 11:55 AM2017-05-02T11:55:52+5:302017-05-02T11:55:52+5:30
51154-भुसावळहून मुंबईला (सीएसटी) जाणारी पॅसेंजर गाडी मंगळवारी अचानक रद्द करण्यात आली.
Next
ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.2- 51154-भुसावळहून मुंबईला (सीएसटी) जाणारी पॅसेंजर गाडी मंगळवारी अचानक रद्द करण्यात आली. तांत्रिक कारणामुळे ही गाडी आज मुंबई जाऊ शकणार नसल्याचे रेल्वेने जाहीर केले आहे. याबाबत सकाळी प्रशासनातर्फे प्रवाशांची गैरसोय व धावपळ होऊ नये म्हणून उद्घोषणा करण्यात आली.
दरम्यान, ही गाडी रद्द झाल्याने या गाडीने प्रवास करणा:या हजारो प्रवाशांचे प्रवासांचे नियोजन गडबडले. प्रवाशांची चांगलीच पळापळ झाली. या गाडीने नियमित, जळगाव, पाचोरा, चाळीसगावर्पयत प्रवास करणा:या चाकरमाण्यांना त्रास सहन करावा लागला. दरम्यान, भुसावळ येथून, जळगाव व पाचोरा येथे मोठय़ा प्रमाणावर विद्यार्थी-विद्यार्थिनी आयटीआयसाठी जात असतात त्यांना यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागला.
दरम्यान, सकाळी 6.30 वाजता भुसावळ-मुंबई पॅसेंजर रद्द करण्यात आल्याबाबत उद्घोषणा केली जात होती. शिवाय प्रवाशांना त्रास झाल्याबद्दल रेल्वेतर्फे खेद व्यक्त केला जात असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
50 स्थानकांवर थांबणारी गाडी
भुसावळ येथून निघणारी ही पॅसेंजर गाडी मुंबई र्पयत सुमारे 50 स्थानकावर थांबत असून या गाडीने भुसावळ येथून रोज 500-600 प्रवासी येथून बसतात. या गाडीला साधारण श्रेणीतील 17 डबे जोडलेले असतात, असे सूत्रांनी सांगितले. या गाडीने प्रवास करणारे प्रवासी महानगरी व अन्य हॉलीडे स्पेशलने रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
गाडी रद्दचे असे आहे तांत्रिक कारण
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात मालगाडीला 1 रोजी मोठा अपघात झाला होता. या मार्गावर भुसावळ येथे येणारी 51153 मुंबई भुसावळ या गाडीचे डबे जोडून त्या मार्गावर गाडी चालविण्यात आली. 1 रोजी मुंबईहून गाडी न आल्याने 2 रोजी मुंबईला जाणारी गाडी रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भुसावळ-पॅसेंजर 2 रोजी रद्द करण्यात आल्याबाबतचा संदेश मुंबई मुख्यालयातून 1 रोजी प्राप्त होताच त्याबाबत स्थानिक प्रशासनाने उपाय योजना करुन नोटीस बोर्डावर माहिती दिली. शिवाय नियमित उद्घोषणाही केली जात होती. प्रवाशांची गैरसोय झाली नाही.
- सुनील मिश्रा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक,
डीआरएम कार्यालय, भुसावळ.