पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे दहा महिन्यांपासून प्रवाशांची होतेय गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:09 AM2020-12-28T04:09:36+5:302020-12-28T04:09:36+5:30

इन्फो : महानगरी, कामायनी एक्स्प्रेस सुरू रेल्वे प्रशासनातर्फे टप्प्या-टप्प्याने विविध प्रवासी गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबईकडे जाणाऱ्या ...

Passengers have been inconvenienced for ten months due to closure of passenger trains | पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे दहा महिन्यांपासून प्रवाशांची होतेय गैरसोय

पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे दहा महिन्यांपासून प्रवाशांची होतेय गैरसोय

googlenewsNext

इन्फो :

महानगरी, कामायनी एक्स्प्रेस सुरू

रेल्वे प्रशासनातर्फे टप्प्या-टप्प्याने विविध प्रवासी गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबईकडे जाणाऱ्या महानगरी एक्स्प्रेस, कामायनी एक्स्प्रेस, कुशीनगर एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस , पवन एक्स्प्रेस, जनता एक्स्प्रेस आदी गाड्यांचा समावेश आहे,. तर पुणे मार्गावर दानापूर एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस व झेलम एक्स्प्रेसचा समावेश आहे.

इन्फो :

पॅसेंजर सुरू होण्याची प्रतीक्षाच

एकीकडे टप्प्या-टप्प्याने विविध एक्स्प्रेस सुरू करण्यात येत असताना दुसरीकडे मात्र, भुसावळ विभागातून धावणाऱ्या मुंबई पॅसेंजर, देवळाली पॅसेंजर, सुरत पॅसेंजर, नागपूर पॅसेंजर, अमरावती पॅसेंजर, धुळे पॅसेंजर आदी १६ पॅसेंजरची सेवा बंद आहे. त्यामुळे लाखो प्रवाशांची गैरसोय होत आहे.

इन्फो :

गरीब प्रवाशांची होतेय फरकट

कोरोनाचे कारण सांगून रेल्वे प्रशासनातर्फे अद्यापही पॅसेंजर बंद असल्यामुळे, याचा सर्वाधिक फटका गरीब प्रवाशांना बसत आहे. नाशिक, पुणे, मुंबई किंवा जिल्ह्याच्या इतर ठिकाणी जाण्यासाठी बहुतांश प्रवासी कमी भाडे असलेल्या पॅसेंजरचाच आधार घेतात. मात्र, पॅसेंजर बंद असल्यामुळे या प्रवाशांना संबंधित गावांना जाण्यासाठी तिप्पट भाडे खर्च करून जावे लागत आहे.

इन्फो :

पॅसेंजर गाडी ही सर्व सामान्य गरीब प्रवासी व चाकरमान्यासांठी सोयीची गाडी असते. भाड्याच्या दृष्टीने परवडणारी गाडी असते. मात्र, आता पॅसेंजर बंद असल्यामुळे प्रवाशांना जादा पैसे मोजून खासगी बसने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे तातडीने पॅसेंजर सुरू करण्याची आमची मागणी आहे.

नितीन सोनवणे, अध्यक्ष, चाळीसगाव प्रवासी संघटना

Web Title: Passengers have been inconvenienced for ten months due to closure of passenger trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.