भुसावळात भारिपचे दोन्ही जिल्हाध्यक्ष स्थानबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 12:05 AM2018-10-09T00:05:02+5:302018-10-09T00:05:49+5:30

विविध कार्यक्रमांचे उद्घाटन व कार्यक्रमासाठी जळगाव दौऱ्यावर आलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची परवानगी मागणाºया भारिप-बहुजन महासंघाच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांना पोलीस विभागाने स्थानबद्ध केले.

In the past, both the District President of Bharipesh landed | भुसावळात भारिपचे दोन्ही जिल्हाध्यक्ष स्थानबद्ध

भुसावळात भारिपचे दोन्ही जिल्हाध्यक्ष स्थानबद्ध

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखविल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केली स्थानबद्धतेची कारवाईभारिप नेत्यांनी पोलिसांवर केला हुकुमशाहीचा आरोप

भुसावळ, जि.जळगाव : विविध कार्यक्रमांचे उद्घाटन व कार्यक्रमासाठी जळगाव दौऱ्यावर आलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची परवानगी मागणाºया भारिप-बहुजन महासंघाच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांना पोलीस विभागाने स्थानबद्ध केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ८ आॅक्टोबर रोजी जळगाव दौºयावर आले होते. जळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, मागासवर्गीय व ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पूर्ववत व वेळेवर मिळावी, जिल्ह्याला पूर्णवेळ पालकमंत्री मिळावा, शेतमालाला योग्य हमी भाव देण्यात यावा आदी मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष विजय उर्फ बाळा पवार आदींनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे लेखी पत्र देऊन मुख्यमंत्र्यांना भेटीची व निवेदन देण्यासाठी परवानगी मागितली होती.
पोलीस व महसूल विभागाने परवानगी न देता जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष विजय पवार या दोघांना घरून बोलवत स्थानबद्ध केले. यापूर्वी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ताफा अचानक भारिप-बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी अडविला होता. त्यामुळे पोलिस विभागा व प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली होती. पोलीस उपअधीक्षक गजानन राठोड, पोलीस निरीक्षक देवीदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज ठाकरे, पोलीस कर्मचारी छोटू वैद्य, बाळू पाटील, नंदू सोनवणे व दीपक जाधव यांनी ही कारवाई केली.
या वेळी पोलीस ठाण्यात एमआयएमचे तालुकाध्यक्ष फिरोज शेख, शहर सचिव मुजाहिद शेख, भारिप जिल्हा सचिव दिनेश ईखारे, विद्यासागर खरात, रुपेश साळुंखे, अरुण नरवाडे, नीलेश जाधव, तुषार जाधव, स्वप्नील इंगळे, अरुण तायडे, जयराज आव्हाड, सोनू वाघमारे आदी उपस्थित होते.
जिल्ह्याच्या दौºयावर राज्याचे मुख्यमंत्री येत असल्याने शेतकरी, अनुसूचित जाती, जमाती व ओबीसी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती आदी विषय मार्गी लावण्यासाठी लोकशाही मार्गाने भारिप बहुजन महासंघ मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन चर्चा करण्यासाठी महसूल विभाग व पोलिस विभागाला ६ आॅक्टोबर रोजी रीतसर परवानगीसाठी अर्ज दिला होता. मात्र मुख्यमंत्र्यांना भेटण्याची परवानगी न देता उलट आम्हाला पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. हा विषय म्हणजे लोकशाहीत सरकार व प्रशासनाची हुकुमशाही असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.




 

Web Title: In the past, both the District President of Bharipesh landed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.