दोन महिन्यांपासून खाजगी रुग्णवाहिकांची बिले थकली व इंधनही बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 06:10 PM2020-09-12T18:10:17+5:302020-09-12T18:12:28+5:30

भाडेतत्त्वावर अधिग्रहित केलेल्या रुग्णवाहिकेचे भाडे गेल्या दोन महिन्यांपासून थकले असून, इंधनाचे बिलही न मिळाल्याने रुग्णवाहिका बंद करण्याची वेळ आली आहे.

For the past two months, private ambulance bills have been stagnant and fuel has been cut off | दोन महिन्यांपासून खाजगी रुग्णवाहिकांची बिले थकली व इंधनही बंद

दोन महिन्यांपासून खाजगी रुग्णवाहिकांची बिले थकली व इंधनही बंद

Next

मुक्ताईनगर : येथील उपजिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोविड-१९ करिता भाडेतत्त्वावर अधिग्रहित केलेल्या रुग्णवाहिकेचे भाडे गेल्या दोन महिन्यांपासून थकले असून, इंधनाचे बिलही न मिळाल्याने रुग्णवाहिका बंद करण्याची वेळ आली आहे.
दोन महिन्याचे रुग्णवाहिकेचे गाडी मिळावे म्हणून रुग्णवाहिका चालक योगेश पाटील यांनी व इतर सहकाऱ्यांनी आमदार चंद्रकांत पाटील व खासदार रक्षा खडसे यांना निवेदन देऊन बिल मिळण्याची मागणी केली आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यात ७१ खासगी रुग्णवाहिका अधिग्रहीत केलेल्या होत्या. त्या-त्या तालुक्यातील तहसीलदार त्या रुग्णवाहिकांची बिले आणि इंधन पुरणार होते. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून रुग्णवाहिका मालकांनी बिले मिळाले नसल्याची तक्रार समोर आली आहे.
विशेष म्हणजे इंधनही बंद करण्यात आले असल्याने खासगी रुग्णवाहिका चालक योगेश पाटील यांनी मुक्ताईनगर येथील रुग्णवाहिका बंद केली आहे. विशेष म्हणजे हीच परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात असून जिल्हाधिकाºयांचा आदेश असतानादेखील इंधन आणि बिल मिळत नसल्याने रुग्णवाहिका बंद करण्याची व रुग्णवाहिका मालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून सदर रुग्णवाहिकांची देयके जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयात पडलेले आहेत. बिलच न मिळाल्याने इंधन भरायचे कसे आणि उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न योगेश श्यामराव पाटील, पीयूष पाटील, नदोम शेख यांनी उपस्थित केला आहे.
 

Web Title: For the past two months, private ambulance bills have been stagnant and fuel has been cut off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.