पातोंडा येथे लाचखोर भूमापकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 11:16 PM2018-10-10T23:16:17+5:302018-10-10T23:18:13+5:30
घराला नाव लावण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पातोंडा येथील परिरक्षण भूमापक महेंद्र दत्तात्रय म्हस्के यास रंगेहात पकडले. बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.
Next
ठळक मुद्देलाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईघर नावावर लावण्यासाठी घेतली तीन हजाराची लाचअमळनेर पोलिसात गुन्हा दाखल
अमळनेर : घराला नाव लावण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पातोंडा येथील परिरक्षण भूमापक महेंद्र दत्तात्रय म्हस्के यास रंगेहात पकडले. बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.
आजोबांच्या नावावर असलेले घर पिळोदा येथील अविनाश पवार यांच्या वडिलांच्या नावावर करायचे होते. त्यासाठी त्यांनी अर्ज दिला होता. त्यावर भूमिअभिलेख कायार्यालतील परिरक्षण भूमापक म्हस्के याने नाव दाखल करण्यासाठी ५ हजर रुपये लाच मागितली. १० रोजी निरीक्षक नीता कायटे व नीलेश लोधीसह इतर अधिकाºयांनी सापळा रचून ३ हजार रुपये लाच घेताना म्हस्के यांना रंगेहात पकडले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.