डॉक्टरांच्या बंदमुळे रुग्णांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:00 PM2019-08-01T12:00:08+5:302019-08-01T12:02:34+5:30

आयएमएचा संप : शासकीय वैद्यकिय रुग्णालयावर भार

Patient conditions due to doctor closure | डॉक्टरांच्या बंदमुळे रुग्णांचे हाल

डॉक्टरांच्या बंदमुळे रुग्णांचे हाल

Next


जळगाव : लोकसभेत संमत झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकास इंडीयन मेडीकल असोसिएशनने विरोध केला आहे. यासाठी बुधवारी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवून शासनाचा निषेध केला. आयएमएच्या सभागृहाबाहेर डॉक्टरांनी वैद्यकीय आयोगाच्या विधेयकविरुद्ध घोषणा दिल्या. डॉक्टरांच्या हातात या विधेयकाला विरोध दर्शविणारे फलक होते. दरम्यान, डॉक्टरांच्या या बंदमुळे रुग्णांचे कमालीचे हाल झाले. तर दुसरीकडे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली होती.
नव्या विधेयकानुसार भारतीय वैद्यक परिषदेचे प्रातिनिधिक अस्तित्व संपुष्टात येणार असून नव्या आयोगात शासन नियुक्त प्रतिनिधींची वर्णी लागणार आहे. फक्त ५ राज्यांना एकावेळी प्रतिनिधीत्व मिळेल. म्हणजे इतर राज्ये, विद्यापीठे आणि वैद्यकीय व्यावसायिक यांना अजिबात थारा नाही.
सध्या १३४ सदस्य असलेल्या परीषदेचे कार्य २५ जण कसे सांभाळू शकतील? आयुर्वेद, युनानी, होमिओ अशा इतर उपचार पद्धतीच्या पदवीधारकांना, एवढेच नव्हे तर, आरोग्य व्यवस्था सबंधित कोणासही म्हणजे नर्सेस, टेक्निशियन, किंवा सहाय्यक यांना प्रशिक्षण देउन आधुनिक वैद्यक शास्त्राचे उपचार करण्याची मुभा देणे हे अशास्त्रीय आणि समाजावर अन्याय केल्यासारखे असल्याचे आयएमएचे म्हणणे आहे.

आपत्कालिन सेवा सुरु
आयएमए संघटनेने बंद पुकारलेला असला तरी आपत्कालिन सेवा सुरुच होती. डॉक्टरांनी माणुसकी जपत अत्यवस्थ रुग्णांची तपासणी करुन उपचार केले. इतर सर्व सेवा बंद होती. दरम्यान, सकाळी ६ वाजेपासून गुरुवारी सकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यातील आयएमएच्या सर्व सभासदांचे दवाखाने बंद होते.

आयएमएचे सर्व सदस्य व.वा. वाचनालायजवळील आयएमए सभागृहात एकत्र जमले होते. डॉक्टरांच्या हातात या विधेयकाला विरोध दर्शविणारे फलक होते.
सर्वांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी अध्यक्ष डॉ प्रदीप जोशी, सचिव डॉ.धर्मेंद्र पाटील, डॉ. जितेंद्र कोल्हे, डॉ.अनुप येवले, डॉ. प्रशांत देशमुख ,डॉ. विवेक पाटील, डॉ. तुषार बेंडाळे, डॉ.भरत बोरोले डॉ.निलेश चांडक, डॉ.स्वप्नील कोठारी, डॉ.सुनील सुर्यवंशी, डॉ. ज्ञानेश पाटील व डॉ.पवन चांडक आदी उपस्थित होते.

Web Title: Patient conditions due to doctor closure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.