कोविडच्या सीथ्री कक्षात रुग्ण हलविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:32 AM2020-12-16T04:32:28+5:302020-12-16T04:32:28+5:30
जळगाव : येत्या गुरुवार, १८ डिसेंबरपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नॉनकोविडची सुविधा सुरू करण्यात येणार असून, त्या पार्श्वभूमीवर ...
जळगाव : येत्या गुरुवार, १८ डिसेंबरपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नॉनकोविडची सुविधा सुरू करण्यात येणार असून, त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सीथ्री कक्ष उघडून त्यात १८ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, नॉनकोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे कोविड रुग्णालयात सकाळी दहा वाजता पाहणी करणार आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून नॉनकोविडचे नियोजन सुरू असून, त्यानुसार बाहेरी कक्षांमध्ये कोविड आतील मुख्य इमारतींमध्ये त्या त्या कक्षांमध्ये आधीसारखेच रुग्ण दाखल करण्याचे नियोजन करण्यात आले आहेत. जो काही बदल आहे तो प्रशासक डॉ. बी. एन. पाटील यांना कळविण्यात आला आहे. त्यानुसार बुधवारी याबाबत अंतिम निर्णय होणार आहे. दरम्यान, १७ डिसेंबरपासून नॉनकोविड करण्याचे नियोजन असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी होणारी पाहणी महत्त्वाची ठरणार आहे.