पिंप्राळ्यात रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:32 AM2020-12-16T04:32:05+5:302020-12-16T04:32:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील पिंप्राळा परिसरात रुग्णवाढ समोर आली असून, या भागातील श्रीराम चौकात दोन, तर पिंप्राळा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील पिंप्राळा परिसरात रुग्णवाढ समोर आली असून, या भागातील श्रीराम चौकात दोन, तर पिंप्राळा परिसरात एक बाधित रुग्ण आढळून आला आहे. जिल्ह्यात मंगळवारी (दि.१५) ३९ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यात शहरातील पाच रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात मंगळवारी १८५८ चाचण्या झाल्या यात आरटीपीसीआरचे प्रमाण अधिक होते. दरम्यान, आलेल्या अहवालांमध्ये ६२५ आरटीपीसीआर निगेटिव्ह तसेच १४ बाधित, तर ॲन्टिजेनमध्ये २५ बाधित ७६७ निगेटिव्ह अहवाल आले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५५,१६० वर पोहोचली असून, बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५३,४८२ वर पोहोचली आहे. जळगाव शहरातील ५९ वर्षीय पुरुषाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतांची संख्या १३१५ वर आली आहे.
या भागात आढळले रुग्ण
पिंप्राळा ३, दयाराम गल्ली, ज्ञानेश्वरनगर, गणपतीनगर, राधाकृष्णनगर, गणेशनगर या भागात प्रत्येकी दोन, तर गणपती हॉस्पिटल, आंबेडकर मार्केट, अयोध्यानगर या भागात प्रत्येकी एक बाधित आढळून आला आहे.