रुग्णांची लागते लाईन, अन्य लोकांना गेटवरच थांबारुग्णांची लागते लाईन, अन्य लोकांना गेटवरच थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:16 AM2021-03-21T04:16:11+5:302021-03-21T04:16:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात कोरोनाचा रुग्ण अगदी झपाट्याने वाढत असून कोविड केअर सेंटरची संख्या हळू हळू वाढविण्यात ...

Patients line up, other people wait at the gate Patients line up, other people wait at the gate | रुग्णांची लागते लाईन, अन्य लोकांना गेटवरच थांबारुग्णांची लागते लाईन, अन्य लोकांना गेटवरच थांबा

रुग्णांची लागते लाईन, अन्य लोकांना गेटवरच थांबारुग्णांची लागते लाईन, अन्य लोकांना गेटवरच थांबा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात कोरोनाचा रुग्ण अगदी झपाट्याने वाढत असून कोविड केअर सेंटरची संख्या हळू हळू वाढविण्यात येत आहेत. आहे ते कोविड केअर सेंटर फुल होत असल्याने यंत्रणेवरचा ताण वाढला आहे. महापालिकेच्या दोन कोविड केअर सेंटरवर अत्यंत विपरीत परिस्थिती असून शासकीय अभियांत्रिकीच्या सेंटरमध्ये कर्मचारी असतात मात्र, सिंधी कॉलनीतील सेंटरवर कर्मचारी कमी असल्याचे चित्र आहे.

शनिवारी दुपारी साडे अकरा ते एक वाजेच्या सुमारास या दोनही केंद्रावर भेट दिल्यानंतर हे चित्र समोर आले. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात रुग्णसंख्येचा विस्फोट होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोविड केअर सेंटरच्या इमारती फुलल होत आहेत. यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ४ इमारती असून तंत्रनिकेतनलाही एक इमारत सुरू करण्यात आली आहे. अन्य दोन इमारतींची स्वच्छता केली जात आहे.

असे होते चित्र

सिंधी कॉलनी

दुपारी साडे बाराच्या सुमारास जेवण वाटप होत होते. काही तरूण बाहे थांबून होते. एक परिचारिका गेटजवळच असलेलया टेबलवर बसलेल्या होत्या. गेट अर्धवट लावलेले होते.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय : शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये सकाळी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान अनेक रुग्णांन डिस्चार्ज दिला जात होता. नवीन रुग्णांची रांग लागलेली होती. दरम्यान, गेटवर एक सुरक्षा रक्षक होते. ते रुग्णांची रांग व्यवस्थित करीत होते.

कोविड केअर सेंटर बेड

९२२

रुग्ण

१०८०

कोविड केअर सेंटरमधील बेड वाढविण्यावर भर दिला जात आहे. इमारतींमध्ये सुरक्षा रक्षक आहेत. मात्र, अनेक नातेवाईक आत जाण्यासाठी वाद घालतात, असे असल्याने मग आयासोलेशनचा अर्थ काय असा प्रश्न उपस्थित होतो. आणखी बेउ वाढविण्यात येणार आहे. - डॉ. विजय घोलप , वैद्यकीय अधिकारी मनपा

Web Title: Patients line up, other people wait at the gate Patients line up, other people wait at the gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.