डॉक्टरांच्या संपामुळे रुग्ण सेवा कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:26 PM2019-06-18T12:26:02+5:302019-06-18T12:26:32+5:30

कोलकाता घटनेचा निषेध

The patient's service collapsed due to a doctor's injuries | डॉक्टरांच्या संपामुळे रुग्ण सेवा कोलमडली

डॉक्टरांच्या संपामुळे रुग्ण सेवा कोलमडली

Next

जळगाव : कोलकाता येथे डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी शहरातील डॉक्टरांनी २४ तासासाठी बंद पुकारला. डॉक्टरांवरील हल्ले त्वरित रोखण्यात यावेत, हल्ला करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, कोलकाता येथील हल्ला झालेल्या डॉक्टरांना न्याय मिळावा, पश्चिम बंगाल सरकारने डॉक्टरांची माफी मागावी, अशा विविध मागण्या आयएमए संघटनेने यावेळी मांडल्या. दरम्यान, बंदची माहिती नसल्याने अनेक रुग्णांचा गोंधळ झाला.
शहरातील व.वा. वाचनालयाजवळ असलेल्या डॉ.जे.जी.पंडित आय.एम.ए. हॉल येथील कै.डॉ. दावलभक्त सभागृहात सोमवारी सकाळी १० वाजता इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) जळगाव शाखेच्या वतीने बैठक घेण्यात आली. अध्यक्ष डॉ.प्रदीप जोशी, सचिव डॉ.धर्मेंद्र पाटील ,डॉ.प्रताप जाधव,डॉ विलास भोळे, डॉ.अर्जुन भंगाळे डॉ.सुदर्शन नवाल आदींनी देखील घटनेचा निषेध करत न्याय मिळावा अशी मागणी केली. यावेळी व्यासपीठावर सचिव सहसचिव डॉ. स्नेहल फेगडे, सहसचिव डॉ. राधेश्याम चौधरी, महाराष्ट्र पदाधिकारी डॉ.अनिल पाटील, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे पदाधिकारी डॉ. प्रताप जाधव, माजी सचिव डॉ. विलास भोळे आणि डॉ. राजेश पाटील, डॉ. अर्जुन भंगाळे, डॉ. चं्रशेखर सिकची, डॉ. सुनील नहाटा यांच्यासह शहर व जिल्ह्यातील आयएमएचे सदस्य उपस्थित होते. दरम्यान, या संपाला एमआर संघटनेनेही पाठींबा दिला आहे.
सभेनंतर डॉक्टरांकडून घोषणाबाजी
डॉक्टरांची निषेध सभा संपल्यानंतर आय.एम.ए.सभागृहाबाहेर ह्यडॉक्टरांचा जीव वाचवा ह्य,ह्णदोषींना शिक्षा झालीच पाहिजेह्ण अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी डॉक्टरांच्या हातात कोलकाता येथील घटनेचा निषेध फलक होता.रविवारीदेखील डॉक्टरांनी या घटनेचा निषेध म्हणून आय.एम.ए.हॉल येथे रक्तदान करीत गांधीमार्गाने निदर्शन केले.

Web Title: The patient's service collapsed due to a doctor's injuries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव