रुग्णांनी लवकर रुग्णालयात यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:17 AM2021-05-09T04:17:16+5:302021-05-09T04:17:16+5:30
१ रुग्णांनी अंगावर न काढता तातडीने निदान करून घ्यावे २ कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याचे प्रत्येक व्यक्तिवर वेगवेगळे परिणाम होत ...
१ रुग्णांनी अंगावर न काढता तातडीने निदान करून घ्यावे
२ कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याचे प्रत्येक व्यक्तिवर वेगवेगळे परिणाम होत असतात, यात त्यांची प्रतिकार क्षमता महत्त्वाची असते.
३ ही महामारी असून सर्वत्रच परिस्थिती बिकट असून मृत्यू होत आहे. कोणत्याच डॉक्टराला त्याचा रुग्णाचा मृत्यू व्हावा, असे वाटत नाही, सर्वच डॉक्टर पूर्ण प्रयत्न करीत आहेत. नातेवाईकांनी या बाबी समजून घ्याव्यात.
कोट
रुग्णाचा मृत्यू होणे हे अत्यंत दुर्देवी असते. कधी कधी डॉक्टरही ते टाळू शकत नाही. डॉक्टर व रुग्णांचे नातेवाईक यांच्यात सुसंवाद हवा, रुग्णाच्या प्रकृतीविषयीची वास्तविकता याविषयी नातेवाईकांना सांगितले गेले पाहिजे. रुग्णाला दाखल केल्यानंतर उपचार करून प्रत्येक रुग्ण वाचविता येऊ शकतो असा वैद्यकशास्त्रात कोणातेच डॉक्टर गॅरंटी देऊ शकत नाही. डॉक्टर हे देव नाहीत किंवा दानवही नाहीत, आपल्या रुग्णांना वाचविण्यासाठी बुद्धी कौशल्याचा वापर करणारे ते मानवच आहेत. याची जाणीव नातेवाईकांनी ठेवावे, नातेवाईव व डॉक्टरांमध्ये सुसंवाद हवा, आजचा काळ हा रुग्णांनी, नातेवाईकांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी डॉक्टरांशी भांडण्याचा नसून एकत्रीत येऊन कोरोशनी लढण्याचा आहे. रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांइतकेच दु:ख डॉक्टरांना असते, हे नातेवईकांनी विसरू नये, राजकीय पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जावून डॉक्टरांची तपासणी करणे हे कायद्याच्या चौकटीत बसत नाही. डॉक्टरांचे मनोर्धेर्य खच्चीकरणाचे काम राजकीय पदाधिकाऱ्यांनी टाळावे- डॉ. राधेश्याम चौधरी, सचिव आयएमए