रूग्णांना 'पांघरूणद्वारे मायेची उब'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 09:23 PM2019-11-19T21:23:56+5:302019-11-19T21:24:08+5:30
जळगाव : सध्या थंडीची चाहुल लागली असून सकाळी थंडी जोर धरून लागलेली आहे. अशा स्थितीत गरजू, गरिब रूग्णांचा या ...
जळगाव : सध्या थंडीची चाहुल लागली असून सकाळी थंडी जोर धरून लागलेली आहे. अशा स्थितीत गरजू, गरिब रूग्णांचा या थंडीपासून बचाव व्हावा, म्हणून सै़ नियाज अली भैय्या फाऊंडेशनतर्फे जिल्हा रूग्णालयात ब्लँकेट वाटप करण्यात आले़
समाजात असे अनेक दुर्बल, गरीब लोक आहेत की, त्यांच्याकडे अशा साधन सामुग्री नाहीत की ज्यामुळे ते थंडीपासून आपला बचाव करू शकतात.
या विषयाची व या अशा दुर्बल व गरीब लोकांना थंडीपासून होणाऱ्या त्रासापासून बचाव होण्यासाठी १८ रोजी सकाळी जिल्हा सामान्य रूग्णालयात सै.नियाज अली भैय्या फाऊंडेशनतर्फे लोकांना पांघरूणाद्वारे मायेची ऊब या कार्यक्रमाचे आयोजन करून त्यात गरजू लोकांनी जिल्हा अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या हस्ते व शनिपेठचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, सैय्यद अयाज अली नियाज अली यांच्या प्रमुख उपस्थितीत ब्लॅकेट वाटप करण्यात आले. तसेच रेल्वे स्टेशन परिसर व शहरातील अन्य भागात रात्री बेघर लोकांना सुद्धा ब्लँकेट, कंबलचे वाटप करण्यात आलेले आहे.
याप्रसंगी पोलीस अधीक्षकांनी या उपक्रमाचे व सै.नियाज अली भैय्या फाऊंडेशनचे कौतुक करताना सांगितले की, थंडीमुळे लोकांना फार त्रास सहन करावा लागतो. पैशांअभावी त्यांना स्वेटर, कंबल सारख्या गोष्टी खरेदी न करता आल्यामुळे त्यांची गैरसोय होते, मात्र तुमच्या मुळे थंडीत ही लोकांना पांघरूणाद्वारे मायेची ऊब मिळणार आहे.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, सैय्यद अयाज आली नियाज अली, रियाज अली नियाज अली, निलेश आबा सपकाळे, नाजीम पेंटर, अबरार शाह, जावेद सैय्यद, शफी शेख, शेख आरीफ, राहुल चौधरी, सैफु पेंटर, शेख कुर्बान, दिनेश लखारा, शेख इब्राहीम, मतीन नुरबशर, शेख सईद यासह सिव्हील हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.
या सामाजिक उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले आहे़ यावेळी जिल्हा रुग्णालयातील आलेले काही रुग्णही उपस्थित होते.