पाचो:या संपाची धग कायम, रस्त्यावर भाजीपाल्याचा खच, दुधाची नदी
By admin | Published: June 3, 2017 01:46 PM2017-06-03T13:46:43+5:302017-06-03T13:46:43+5:30
‘एक दिवस बळीराजासाठी’ हे धरणे आंदोलन
ऑनलाईन लोकमत
पाचोरा, जळगाव, दि. 3 - शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पाचोरा येथे ‘एक दिवस बळीराजासाठी’ हे धरणे आंदोलन शनिवारी माजी आमदार दिलीप वाघ, संजय वाघ आणि नितीन तावडे यांच्या नेतृत्वाली करण्यात आले. यावेळी शेतक:यांनी दूध, कित्येक क्विंटल टमाटे आणि कांदे रस्त्यावर फेकून सरकारच्या भूमिकेविरोधात संताप व्यक्त केला. शिवाजी चौकात टमाटे आणि कांदे यांचा खच पडला होता तर दुधाची नदी वाहत होती.
यावेळी बोलताना माजी आमदार वाघ यांनी आंदोलनाची सरकारला पूर्वीपासून कल्पना असूनही शेतक:यांना गृहीत धरल्यामुळे हे आंदोलन पेटले असून शेतकरी आणि जनतेचे प्रचंड हाल झाले असल्याचे सांगितले. सरकारने पुन्हा खोटी आश्वासने देऊन केवळ अल्पभूधारक शेतक:यांना कर्जमाफी जाहीर करीत शेतकरी आंदोलनात फूट पाडली आहे. शेतक:यांना सरसकट कर्जमाफी मिळायलाच पाहिजे अशी मागणी करीत शेतक:यांना आत्महत्येच्या खाईत लोटणारे हे सरकार असल्याचे सांगितले. नायब तहसीलदार सो.ना. मगर यांना यावेळी निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संजय वाघ, नगरसेवक विकास पाटील, प्रवक्ते खलील देशमुख, नितीन तावडे, रणजित पाटील, अरुण पाटील, सतीश चौधरी, राष्ट्रवादी तालुकअध्यक्ष विकास पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक, शेतकरी, कार्यकर्ते, मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
त्यानंतर झालेल्या पत्र परिषदेत माजी आमदार दिलीप वाघ यांनी विद्यमान आमदार किशोर पाटील यांनी तरुण आणि शेतक:यांची दिशाभूल केली असून 1 लाख शेतकरी कर्जमाफी फॉर्म ही नौटंकी सुरू केल्याचे सांगताना माजी आमदार आर. ओ. पाटील यांनी तेच केले असल्याचे सांगितले.