पाचो:याच्या रँचोने निर्मिले 200 पेक्षा अधिक विद्युत उपकरणे

By admin | Published: July 15, 2017 05:26 PM2017-07-15T17:26:04+5:302017-07-15T17:26:04+5:30

पेटंट मिळविण्यासाठी प्रयत्न : योगेश बारी यांची ‘गॅजेट मॅन’ म्हणून ओळख

PATO: More than 200 electric appliances manufactured by Rancho | पाचो:याच्या रँचोने निर्मिले 200 पेक्षा अधिक विद्युत उपकरणे

पाचो:याच्या रँचोने निर्मिले 200 पेक्षा अधिक विद्युत उपकरणे

Next
>महेश कौंडिण्य /ऑनलाईन लोकमत
पाचोरा,दि 15 - संकटकाळी मानवाच्या मदतीसाठी उपयोगी पडणा:या 200 पेक्षा अधिक उपकरणांची पाचोरा शहरातील रँचो अर्थात योगेश बारी या तरुणाने निर्मिती केली आहे. या उपकरणांना पेटंट मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे.
चोरांना पळविणारे ब्रrास्त्र कवच!
घर, दुकान, कार्यालय आणि इमारतींना चोरांपासून संरक्षण देणारे ब्रrास्त्र कवच नावाचे उपकरण तयार केले आहे. बॅटरी ,सेन्सर सर्किट, मोबाईल,प्लग, बटण, वायर, चार्जर, प्लास्टिक बॉक्स, सप्लाय सर्किट, एकशे वीस डी बी चा सायरन वापरून तयार झालेले हे यंत्र दरवाजा किंवा खिडकीला कुणी हात लावल्यास किंवा कडी कापण्याचा कोणी प्रय} केला तर हे उपकरण कार्यरत होऊन सायरन वाजतो तर घरमालक बाहेरगावी असल्यास लगेच कॉल त्यांच्या मोबाईलला लागून घरमालक पोलिसांना सूचित करू शकतात.
दुचाकींचे मायलेज वाढवणारं यंत्र
वर्षभर मेहनत घेऊन रबरी नळी, पीव्हीसी जॉईनर, पीव्हीसी पाईपचा तुकडा, बॅटरी, वायर, इंडिकेटर लाईट, स्टेनलेस पट्टया, नट बोल्ट यासारखे साहित्य वापरून दुचाकींचा मायलेज वाढवणारे आणि प्रदुषण रोखणारे एक्स्ट्रा मायलेज बुस्टर  हे उपकरण तयार केले आहे. त्यामुळे दुचाकींचा मायलेज वीस ते तीस टक्क्यांर्पयत वाढू शकतो आणि प्रदूषणही कमी होऊ शकते असा दावा योगेश बारी यांनी केला आहे. याशिवाय मोटार सायकल इंजिन कुलिंग सिस्टिम आणि अँटी थेफ्ट टू व्हीलर मोबाईल कॉलिंग इंडिकेटर किट ची निर्मिती केली आहे.
मोबाइलने कार सुरू करणारे यंत्र
चारचाकी वाहनांची चावी सांभाळण्याच्या व्यापातून योगेशने वाहनचालकांना आपल्या नाविन्यपूर्ण संशोधनातून मुक्ती दिली आहे. ठराविक गाडीचा सिक्रेट नंबरने गाडीच्या मोबाईल किटवर कॉल केल्यावर ती गाडी लगेच सुरू किंवा बंद होऊ शकते हे योगेशने सिद्ध केले आहे. त्यामुळे गाडीचोरीचे संकट टळू शकते असे त्याने सांगितले.
तरुणींना सुरक्षा देणारे जॅकेट
महिलांची सुरक्षा करणा:या ज्ॉकेटची निर्मिती बारी यांनी केली आहे. एक संशोधन करत असतांना हाय व्होल्टेज शॉक बसला आणि त्यातूनच ही कल्पना सुचली. एक लेदर जॅकेट , इलेक्ट्रॉनिक सर्किट, मेटल शीट, वायर, स्विच, लिक्विड सोल्युशन, छोटी बॅटरी आणि सिक्रेट नंबर असलेला एक मोबाईलचा उपयोग करून त्याने हे उपकरण तयार केले आहे. एखाद्याने महिलेशी छेडखानी केल्यास जॅकेटला असलेले गोपनीय बटन महिलेने अॅक्टिव्हेट केल्यास जॅकेटवर हाय व्होल्टेज करंट सुरू होऊन छेडखानी करणा:या व्यक्तीस जोरदार शॉक बसेल. त्यामुळे छेडखानी करणारी व्यक्ती धाडस करू शकणार नाही तर जॅकेटला असलेली मोबाईल यंत्रणादेखील सुरू होऊन महिलेच्या घरी तात्काळ कॉल लागून घटना कळू शकते.
अग्नी सुरक्षा कवच
गॅस गळती, शॉर्ट सर्किट आणि इतर कारणांमुळे घरात किंवा दुकानात कोठेही आग लागल्यास घर किंवा दुकान मालकाला मोबाईलवर आणि आजूबाजूच्या रहिवाश्यांना सायरनवर धोक्याची सूचना देणारे अग्नी सुरक्षा कवच तयार केले आहे. यात स्टील पेटी, बारा व्होल्टची बॅटरी , सायरन , सेन्सर सर्किट, वॉटर बॅटरी, चार्जर,रिमोट, मोबाईल यासारख्या साहित्याचा तो वापर करतो. या यंत्राला अग्नीचा धूर ओळखणारे फ्लेम सेन्सर जोडलेले असल्यामुळे धूर निर्माण होताच यंत्र कार्यान्वित होऊन मोठा सायरन वाजू लागतो आणि मोबाईल सर्किट सुरू होऊन मालकाच्या मोबाईलवर कॉल दिला जातो.
डास मुक्ती देणारे सोलर पॉवर शॉक यंत्र 
लिक्विडेटर, डास नष्ट करणा:या कॉईल, अगरबत्ती यांचा खर्च न करता अल्प खर्चात सूर्यप्रकाशावर चालणारे  डासांचा नायनाट करणारे सोलर पॉवर शॉक यंत्र  हे योगेशने केलेले आणखी एक संशोधन आहे. या यंत्राला सोलर पॅनल लावल्यामुळे ऊर्जा बॅटरीत साठवली जाते आणि संध्याकाळी ऑटोमॅटिक ए. डी. आर. सेन्सर सुरू होऊन यंत्र कार्यान्वित होते. या सर्किट लावलेल्या जाळी जवळ डास आला तरी तो मरतो. 
योगेशने आजपयर्ंत विविध प्रदर्शनातून जवळ जवळ पावणे दोनशे प्रकल्प सादर केले आहे. ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट कंट्रोल सिस्टिम, वॉटर लेव्हल इंडिकेटर सिस्टिम, होम सेक्युरिटी सिस्टीम, मेटल डिटेक्टर रोबोट युनिट, इलेक्ट्रिकल वॉटर बोट, अर्थक्वेक अलार्म सिस्टिम, बॅग सिक्युरिटी डिव्हाईस यासारख्या अनेक उपकरणांचा समावेश आहे. 
या सर्व उपकरणांचा खर्च अतिशय माफक असून सर्व उपकरणांचे पेटंट मिळवण्याचा योगेशचा मानस आहे. भविष्यात थकवा घालवणारे हॅट, पाय दाबणारे रोबोटिक हात तयार करण्याचा योगेश सध्या प्रय} करतोय.
योगेशला लहानपणापासूनच इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल उपकरणांचे आकर्षण होते. वैज्ञानिक पद्धतीने संशोधन करून समस्येवर उपकरणांची निर्मिती करणे हाच त्याचा छंद बनला. वडील कै. नथ्थू भिका बारी हे वायरमन म्हणून वीज वितरण विभागातच सेवेत असल्यामुळे योगेशला या क्षेत्राची आवड निर्माण झाली आहे. त्याने बारावी इलेक्ट्रॉनिक केल्यानंतर आय टी आय इलेक्ट्रिशियन पूर्ण केले. पुढे त्याने पुण्याला कॉम्प्युटर हार्डवेअर नेटवकिर्ंग डिप्लोमा केला तर हैद्राबादला सी एन सी मशीन ऑपरेटिंग डिप्लोमा पूर्ण केला. आज तो सिक्युरिटी सिस्टीम उपकरणे घर आणि दुकानांसाठी निर्मिती करतोय.
तत्कालीन गृहमंत्री कै. आर आर पाटील यांचे हस्ते त्याला युवा संशोधक हा पुरस्कार बहाल करण्यात आलाय तर योगेश एक उत्कृष्ठ चित्रकार आहे. त्याच्या चित्राला अमेरिकेच्या चित्रप्रदर्शनात स्थान देण्यात आले होते.
 

Web Title: PATO: More than 200 electric appliances manufactured by Rancho

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.