पोतराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 02:51 PM2019-06-09T14:51:09+5:302019-06-09T14:51:27+5:30

भारतीय राज्य घटनेने जी विविध कलमं दिलेली आहेत त्यात हा पोतराज कुठे बसतो, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपले ...

Patraj | पोतराज

पोतराज

Next

भारतीय राज्य घटनेने जी विविध कलमं दिलेली आहेत त्यात हा पोतराज कुठे बसतो, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपले मूलभूत हक्क, अधिकार, कायदे हे त्याला माहीत असतील का? याचे नकारात्मक असेच उत्तर येईल. हीदेखील गंभीरपणे विचारयोग्य बाब आहे. याविषयी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लिहिताहेत सरोजिनी गांजरे-लभाणे...

आज सकाळी मरीआईचा एक भक्त ‘पोतराज’ दारावर आला. तो हातात सोटा घेऊन आपल्या शरीरावर मारून सूर...फट आवाज करून तालावर नाचत होता आणि त्याची बायको. अतिशय निरागस, केविलवाणा चेहरा.
चेहऱ्यावर कोणतेही भाव नाही, संकल्प नाही. फक्त पोटाच्या खळगीसाठी ती गळ्यात अडकवलेल्या तिच्या वाद्यावर दोन हातात काड्या घेऊन गुबुगुबू... असा आवाज करीत होती आणि तो पोतराज त्या तालावर नाचत होता.
ती छोटीशी मुलगी साधारण दहा-बारा वर्षांची आणि तो तिशीचा असेल. हा प्रसंग पाहिला आणि मनात आले की हे सगळे ह्याच देशात आहे? हे आपल्याच देशाचे आहेत? ही आपल्याच देशाची परंपरा आहे. संस्कृती आणि परंपरेच्या जोखडात ही सगळी मंडळी बांधलेली आहेत. यांना नागरिकत्व आहे का? यांना नागरी हक्क माहीत आहे का? आपण हे का करतो? कशासाठी करतो? कुणी या संस्कृतीच्या नावाखाली हे सर्व टिकवलेले आहे? हे सर्व फक्त तोच जाणतो.
ह्या सर्वांचे उत्तर त्यालाही माहीत नाही. ज्या कुटुंबामध्ये जन्माला आलो त्यांचा व्यवसाय स्वीकारला. त्या पलीकडे त्याला कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देता येत नाही. हे विदारक सत्य... किती भयानक आहे. जीवन, संस्कृती आणि संघर्ष याचे मुळात उत्तरच नाही. अनुत्तरीत प्रश्न हे?
ह्या जगामध्ये जगायला भाग पाडत आहे. ही केविलवाणी लहान मुलगी, त्याची बायको जीवन कसे जगायचे? त्याला कसे नटवयाचे? काय आशा असतील तिच्या काहीच नाही? जन्माला आलो, चिमणी, पाखरं जशी या जगात जिवंत आहेत, तसे आम्ही. अशीच भावना...
परंतु एका महासूर्याचा जन्म या पृथ्वीतलावर झाला. त्या महासूर्याने या सगळ्या जीवांना माणूस म्हणून जगण्यासाठी आणि त्यांच्या अधिकारासाठी एक नवी दिशा दिली. ही दिशा इतकी मोठी होती की त्या दिशेने जाणारा प्रत्येक माणूस एक नवा आदर्श या समाजव्यवस्थेमध्ये निर्माण करणार, अशी दिशा... त्याचे नाव आहे डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
ह्या महामानवाने या पोतराजापासून तर या देशाच्या पहिल्या पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापर्यंत समान अधिकार आणि स्वातंत्र्य बहाल केलेले आहे. राजापासून प्रजेपर्यंत एकच न्याय आहे आणि हाच न्याय या देशातील समाज व्यवस्थेला नको आहे.
कारण संस्कृतीच्या गोंडस नावाखाली अनिष्ठ प्रथा आणि परंपरा येथे जोपासायची आहे. परंतु समान कायदा, समान न्याय, स्वातंत्र्य ह्याला कुठेही थारा नाही. ह्या देशातील समाजात न्याय नाही, परंतु एका महामानवाने हे सगळे बदलून महान राज्यघटना देऊन सर्वांना एक केले. समान स्वातंत्र्य न्याय, बंधुता ह्या तत्त्वात त्यांना बांधले.
एकोणिसाव्या शतकात मानवी हक्काचा, मानवी अधिकाराचा जोरदार पुरस्कार केला. संयुक्त राष्ट्र संघाच्या स्थापनेपासून मानवी हक्काविषयी प्रश्नांना विशेष महत्त्व दिले. संयुक्त राष्ट्र संघाच्या सनदेत मानवी हक्क व मूलभूत स्वातंत्र्य यांचा आग्रह धरण्यात आला.
प्रत्येक व्यक्तीला ‘माणूस प्राणी’ या नावाने हे हक्क नैसर्गिकरित्या प्राप्त झाले आहेत. मानवी हक्काची जर व्याख्या करायची झाली तर ही टी. एन. ग्रीन म्हणतात, ‘मानवाच्या आंतरिक विकासासाठी आवश्यक असलेली बाह्य परिस्थिती म्हणजे हक्क होय’ मानवी हक्काचे स्वरूप वंश, लिंग, वय, धर्म, राजकीय विचारप्रणाली कोणत्याही बाबीवर हे हक्क अवलंबून नसतात.
महत्त्वाचे म्हणजे मानवी हक्क जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे. सन्मानाने समाजामध्ये जगण्याला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण ह्या मूलभूत गरजा आवश्यक आहेत. तसेच भय, हिंसा यापासूनही व्यक्तीला मुक्तता मिळायला हवी.
विचार, आचार, संचार यांचे स्वातंत्र्य, समतेचा हक्क, वंश, लिंग, वय, भाषा, धर्म, प्रांत कोणत्याही आधारावर भेदभाव न करता व्यक्तीला समान वागणूक मिळाली पाहिजे. मालमत्ता बाळगण्याचा हक्क. आत्ता सांगा ह्या पोतराजला ह्यातील काय आणि किती माहिती आहे?
ह्या सगळ्या मानवी हक्काबद्दल ह्या देशातील जातपंचायत आणि जातीव्यवस्था ह्यामध्ये अजूनही हा पोतराज परंपराचे जीवन जगतोय. त्याला कुठल्याही हक्काची थोडीही कल्पना नाही.
ह्या मानवी हक्काचे कलम १- परस्पराशी बंधूभावाच्या भावनेने वागले पाहिजे. कारण प्रत्येकाजवळ सद्विवेकबुद्धी आहे. प्रत्येक व्यक्ती जन्मत: समान आहे, असे सांगते.
कलम २- वंश, वर्ण, लिंग, भाषा, धर्म, राजकीय मत, राष्ट्रीयत्व, मालमत्ता आणि जन्मस्थळ या कारणांनी मानवी हक्क नाकारता येणार नाही.
कलम ३- प्रत्येकाला जगण्याचा व स्वातंत्र्याचा अधिकार आहे.
कलम ४- गुलामगिरीवर कायद्याने बंदी आहे.
कलम ५- छळ, अन्याय, अमानुष वागणूक व अवहेलना यापासून प्रत्येकाला संरक्षण मिळेल. ह्या सगळ्या मानवी हक्काच्या कलमांमध्ये हा पोतराज आता बसवा आणि विचार करा की, ह्या सगळ्या कलमांचा ह्याच्या जीवनामध्ये काय परिणाम झाला?
ह्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्याच्या परंपरेत, जीवन पद्धतीत, शिक्षण, सामाजिक, आर्थिक काही प्रगती आहे? यांचे उत्तर आपण त्याला प्रत्यक्षात बघितले तेव्हा कळेल. ह्या सगळ्या मानवी हक्कापासून हा पोतराज कोसो दूर आहे.
तर आपण काय म्हणू शकतो ते बघा. खरंच म्हणू शकतो काय? ‘मॉडर्न इंडिया’ कुठल्या कारणाने म्हणू. ‘आधुनिक भारत’ नाही. मग सांगा ह्या देशातील महामानवाने जे सर्वांग सुंदर भारताचे स्वप्न पाहिले ते आता स्वातंत्र्य मिळून किती साकार करण्यात यशस्वी झालो? ते आपणच विचार करू. आपण सगळेच या देशाचे नागरिक आहोत.
खरंच समतेचा विचार येथे आला. काय वाटते आपणाला? जो हे वाचेल त्यांनी यांचे उत्तर द्यायचे आहे. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय ह्या सगळ्या गोष्टींपासून असे पोतराजसारखे अनेक भटके विमुक्त जाती आहेत; त्या परंपरेचे लोककला, जतन करणारे भटके आहेत. त्यांच्या जीवन पद्धतीत फारसा फरक नाहीे.
कदाचित कुणाला हे चुकीचे वाटू शकते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये हे सगळी मानवी हक्काची कलमे नमूद केलीत. त्याची किती स्वरूपात अंमलबजावणी होत आहे हे आजही गुलदस्त्यात आहे.
आज कितीतरी मोठा समाज शिक्षणापासून वंचित आहे. ह्यासाठी आपण काय करतो? ह्याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे?
मी एक स्त्री असल्याने मला त्या निरागस मुलीचे दु:ख, तिच्या चेहºयावरील भाव कळले आणि लेखणीतूनच तिचे जीवन साकारले. ह्या सगळ्यांचा विचार करणारा महामानव या पृथ्वीवर झाला त्यांचे नाव आहे डॉ.बाबासाहेब आंबेडकर...
-सरोजिनी गांजरे-लभाणे, जळगाव

Web Title: Patraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.