पोषण आहारातील ठेकेदाराला राजाश्रय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:23 PM2019-06-24T12:23:33+5:302019-06-24T12:26:06+5:30

एकनाथराव खडसे : अधिवेशनात सरकारला जाब विचारणार

Patronage to the nutritionist contractor | पोषण आहारातील ठेकेदाराला राजाश्रय

पोषण आहारातील ठेकेदाराला राजाश्रय

Next

जळगाव : लहान मुलांच्या तोंडाचा घास हिसकावणाऱ्या ठेकेदारावर चौकशी होऊनी कारवाई होत नसल्याने ही आश्चर्याची बाब असल्याचे सांगत या ठेकेदाराला पॉवरफूल राजाश्रय असल्याचा आरोप माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी केला आहे. या राजाश्रयाचा आपणही शोध घेत असून या घोटाळ्यासंदर्भात आपण अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रविवारी दुपारी खडसे यांची पत्रकारांनी भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये वाटप होणाºया शालेय पोषण आहारात धान्यादी माल न घेता देयके अदा करण्याचा प्रकार चौकशीतून समोर आला आहे़ या घोटाळ्यावर जि.प. सर्वसाधारण सभेतही सदस्यांनी कारवाईची मागणी केली होती.
दरम्यान, या प्रकरणात ठेकेदाराला नोटीस बजावून त्याच्याकडून या प्रकरणातील एक लाख ६७ हजारांची रक्कम वसूल करण्यात आली आहे़ हा गैरव्यवहार दडपण्यासाठी कुणीतरी मजबूत व्यक्ती ठेकेदाराच्या पाठिशी असल्याचा संशय खडसे यांनी व्यक्त केला़ अधिवेशनात प्रश्न मांडून सरकारला जाब विचारणार असल्याचे ते म्हणाले.
बीएचआरची चौकशी थंड बस्त्यात
४कोट्यावधी रूपयांच्या गैरव्यवहारामुळे बीएचआर पतसंस्थेचे ठेवीदार आजही हवालदील असताना अवसायक जितेंद्र कंडारे यांची बदली करावी असे पत्र केंद्र सरकारने दिलेले असूनही राज्य सरकार बदली का करीत नाही, या पतसंस्थेची आर्थिक विभागामार्फत चौकशी करण्याचेही केंद्र सरकारने आदेश दिले आहे. या आदेशाचे देखिल राज्य सरकारने पालन केले नाही, याचाही जाब विचारणार असल्याचे ते म्हणाले.
विरोधकांमध्ये ईच्छाशक्तीच नाही
विरोधकांकडे आता ईच्छाशक्तीच राहिली नाही, असे सांगत राज्यात पुन्हा भाजपाची सत्ता येईल, असा दावा एकनाथराव खडसे यांनी केला आहे़ लोकसभा निवडणूक निकालाने विरोधक नर्व्हस ब्रेक डाऊन झाले आहे़ प्रश्न जैसे थे होते. तरीदेखील मतदारांनी भाजपाला कौल दिला़ विधानसभेतील जनता भाजपाला मतदान करेल असे खडसे यावेळी म्हणाले़ मुख्यमंत्री पदावरून भाजप-सेनेत काय ठरलय कस ठरलय हे जोपर्यंत उघड होत नाही, तो पर्यंत चर्चा होणारच जागा वाटपांपर्यंत दावे होतीलच असेही ते म्हणाले़ मात्र राज्यात मुख्यमंत्री भाजपाचा होईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Patronage to the nutritionist contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.