मैत्रेयच्या गुंतवणूकदारांना तातडीने पैसे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:12 AM2021-06-17T04:12:45+5:302021-06-17T04:12:45+5:30
यावेळी आमदार किशोर पाटील यांच्याशी चर्चा करताना, तालुकाध्यक्ष शशिकांत दुसाने मैत्रेय कंपनीमध्ये ग्राहकाने गुंतवणूक केलेल्या प्रलंबित रकमेबाबत बोलताना, आठ ...
यावेळी आमदार किशोर पाटील यांच्याशी चर्चा करताना, तालुकाध्यक्ष शशिकांत दुसाने मैत्रेय कंपनीमध्ये ग्राहकाने गुंतवणूक केलेल्या प्रलंबित रकमेबाबत बोलताना, आठ ते दहा वर्षांपासून भडगाव आणि पाचोरा तालुक्याचे करोडो रुपये अडकून पडले असल्याची तक्रार केली. मागील दोन वर्षांपासून कोरोना संसर्गजन्य महामारीमुळे अनेक लोक आजारी पडले. काहींवर उपासमारीची वेळ आली. मग अशा वेळी या गोरगरीब गुंतवणूकदारांना या पैशाचा काहीच उपयोग नसल्याचे म्हटले असून, मैत्रेय कंपनी असोसिएशनमधील प्रतिनिधी व ग्राहक यांच्यात अनेकदा चर्चा झाली असून, अद्याप ग्राहकांना अडकलेली रक्कम परत न मिळाल्याची तक्रारही करण्यात आलेली आहे. हा विषयी शासनाकडे पोहोचविला असून, या विषयाची शासनाने दखल घेत, मैत्रेय कंपनीची मालमत्ता शासनाने शासनाकडे जमा केले असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले असले, तरी मैत्रेय ग्राहकांना पैसे परत मिळत नाहीत, याबद्दल समितीचे अध्यक्ष दुसाने यांनी खेद व्यक्त केला असून, जास्तीतजास्त लक्ष घालून गोरगरीब लोकांना पैसे मिळवून देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. निवेदनावर तालुका अध्यक्ष शशिकांत दुसाने, सचिव महेश कौंडिण्य, जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांच्या स्वाक्षऱ्या असून, यावेळी महिला उपाध्यक्षा किरण पाटील, पाचोरा तालुका महिला अध्यक्षा मंदाकिनी पाटील, पाचोरा तालुका कायदेशीर सल्लागार मानसिंग सिद्धू आणि पाचोरा तालुका जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.
फोटो- आमदार किशोर पाटील यांना निवेदन देताना मानव संरक्षण समितीचे पदाधिकारी.
१७सीडीजे १०