जळगाव जिल्हा बँकेच्या सर्व शाखांतील वीज बील भरणा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 01:10 PM2018-01-28T13:10:51+5:302018-01-28T13:10:59+5:30

ऑनलाईन रोख संकलन प्रणालीचा अवलंब करण्यास असमर्थता

Payment of electricity bill cancle in all the branches of Jalgaon District Bank | जळगाव जिल्हा बँकेच्या सर्व शाखांतील वीज बील भरणा बंद

जळगाव जिल्हा बँकेच्या सर्व शाखांतील वीज बील भरणा बंद

Next

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 28 -  जळगाव जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व शाखांतील वीज बील भरणा स्वीकृती सध्या बंद करण्यात आल्याचे महावितरणच्या वतीने कळविण्यात आले आहे.
ग्राहकांसाठी वीज बील भरण्यासाठी टपाल कार्यालय, ग्रामपंचायत महाऑनलाईन केंद्र, महाऑनलाईन केंद्र, महावितरणचे अधिकृत को-ऑप. सोसायटी केंद्रे इत्यादी ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 
महावितरणची वीज बिल स्वीकारण्यासाठीची ऑनलाईन रोख संकलन प्रणालीचा अवलंब करण्यास असमर्थता दर्शवल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखांमधील वीज बिल भरणा स्वीकृती बंद करण्यात आली असल्याचे कळविण्यात आले आहे. 
या सोबतच ग्राहकांना घरबसल्या ऑनलाईन पध्दतीने वीज बिल भरण्यासाठी अॅप वा महावितरणचे अधिकृत संकेतस्थळ स्थळही असल्याचे कळविण्यात आले असून अधिक माहितीसाठी व तक्रारीसाठी   ग्राहकांनी  महावितरणच्या  संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Web Title: Payment of electricity bill cancle in all the branches of Jalgaon District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.