जळगाव जिल्ह्यात तूर-हरभऱ्याच्या खरेदीचे अद्यापही ३ कोटींचे पेमेंट बाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 10:31 PM2018-09-18T22:31:07+5:302018-09-18T22:32:37+5:30
शेतकरी हवालदिल
जळगाव : खरीप हंगामातील नवीन उडीद मूग, सोयाबीनसाठी खरेदी केंद्र सुरू करण्याच्या हालचाली शासनाकडून सुरू झालेल्या असताना १३ जूनपर्यंत खरेदी केलेल्या तूर-हरभºयाचे अद्यापही ३ कोटींचे पेमेंट बाकी आहे. निधी संपल्याने पेमेंट वाटप रखडले होते. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
शासनाने मागील हंगामात जिल्ह्यात नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करून त्याद्वारे हमीभावाने आधी उडीद-मूगाची व नंतर तूर, हरभºयाची खरेदी केली होती. तूर व हरभरा खरेदी १३ जून २०१८ पर्यंत चालली. जिल्ह्यात सुमारे ८३ कोटी रूपये किंमतीच्या तूर व हरभºयाची खरेदी या हमीभाव केंद्रांवरून करण्यात आली. त्यानंतर तीन महिने उलटले तरीही अद्याप ३ कोटींचे पेमेंट शेतकºयांना अदा करणे बाकी आहे. आजपर्यंत ८० कोटींचे पेमेंट अदा करण्यात आले आहे. मध्यंतरी निधीच शिल्लक नसल्याने शेतकºयांचे पेमेंट अडकले होते. मागील आठवड्यात राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिल्याने पुन्हा पेमेंट अदा करणे सुरू झाले आहे. काही श्ोतकºयांच्या बँक खात्यांचे क्रमांकही चुकले होते. त्यांचेही पेमेंट अडकले होते. ते देखील दुरूस्ती करून अदा करण्याचे काम सुरू आहे.
आॅनलाईन नोंदणी सुरु होणार
शासनाकडून अद्याप नवीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश आलेले नसले तरीही मार्केटिंग फेडरेशनतर्फे तशी पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी संस्थांकडून खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. सध्या उडीद व मुगासाठी अमळनेर, पाचोरा व जळगाव तालुक्यात खरेदी केंद्र सुरू करण्यात येईल. बाकीचे तालुके त्यांना जोडले जातील. खरेदी केंद्र नि िश्चत झाल्यानंतर शेतकºयांकडून आॅनलाईन नोंदणी सुरू होणार आहे.
हमीभाव जाहीर...
शासनाने हमीभाव जाहीर केले असून मूगाला ६९७५ रूपये, उडीद ५६०० तर सोयाबीनला ३३०० रूपये प्रतिक्विंटल भाव जाहीर केला आहे.