जळगाव जिल्ह्यात एक लाखावर शेतकऱ्यांना पीक कर्ज

By admin | Published: June 10, 2017 04:25 PM2017-06-10T16:25:06+5:302017-06-10T17:24:50+5:30

आतार्पयत 627 कोटींचे पीक कर्ज वितरीत केले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Peak loan to one lakh farmers in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात एक लाखावर शेतकऱ्यांना पीक कर्ज

जळगाव जिल्ह्यात एक लाखावर शेतकऱ्यांना पीक कर्ज

Next

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 10 - जिल्हा बॅँकेने वसुलीच्या तुलनेत कर्ज वाटपाचे धोरण ठरविल्याने यंदा खाजगी व राष्ट्रीयकृत बॅँकांना कर्ज वितरणाचे जास्त उद्दीष्ट देण्यात आले असून या बॅँकांनी आतार्पयत 627 कोटींचे  पीक कर्ज वितरीत केले असल्याचा दावा करण्यात आला आहे. कर्ज घेणा:या शेतक:यांची संख्या 1 लाख 1 हजार 643 आहे.
627 कोटी दिले राष्ट्रीयकृत व खाजगी बॅँकांनी
खाजगी बॅँकांमध्ये एसडीएफसी, आयसीआयसीआय व अॅक्सीस या बॅँकांनी शेतक:यांना आतार्पयत 48 कोटी 40 लाखाचे पीक कर्ज वितरीत केले आहे. तर राष्ट्रीयकृत बॅँकांनी 578 कोटी 60 लाखाचे कर्ज वाटप केले आहे. 
3222 कोटींचे उद्दीष्ट
जिल्ह्याच्या पत आराखडय़ानुसार 2017  या वर्षाच्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने बॅँकांना 3222 कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दीष्ट निश्चित करून दिले होते. यात जिल्हा बॅँकेला जवळपास 1100 कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दीष्ट होते. जिल्हा बॅँकेने गेल्या वर्षी दोन हजार कोटींचे कर्ज वाटप केले होते. मात्र मार्चअखेर पीक  कर्जाची वसूली केवळ 500 कोटी झाल्याने बॅँकेने तेवढेच कर्ज वाटपाचा निर्णय घेतला होता. यापेक्षा जास्त कर्ज द्यायचे असल्यास शासनाने बॅँकेला 1500 कोटींची मदत करावी असा निर्णय बॅँकेच्या संचालक मंडळाने घेऊन तशी मागणी शासनाकडे केली  होती.
राष्ट्रीयकृत, खाजगी बॅँकांना जास्त उद्दीष्ट
जिल्हा बॅँकेने कर्ज वाटपाबाबतचे धोरण निश्चित केल्याने प्रशासनाने 3222 पैकी   1100 कोटी जिल्हा बॅँक व उर्वरीत 2122 कोटी राष्ट्रीयकृत बॅँका व खाजगी (व्यापारी) बॅँकांनी शेतक:यांना पीक कर्ज द्यावे असे धोरण पहिल्यापासून निश्चित केले होते.
कर्ज वाटपात अनेक अडचणी
जिल्हा बॅँकेने शासनाच्या आदेशानुसार बॅँकेच्या सभासद शेतक:यांना प्रारंभी रूपे कार्डाच्या माध्यमातून कर्ज विविध बॅँकाच्या एटीएमवरून काढावे असे आदेश केले होते. मात्र एटीएमवर पैसे शिल्लक नसल्याने अनेक ¨ठकाणी शेतक:यांना अडचणी येत आहेत. अखेर पुन्हा जुन्या पद्धतीने म्हणजे स्लिप भरून पैसे काढण्याची परवानगी देण्यात आली. त्यानुसार जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून आतार्पयत शेतक:यांना 380 कोटींचे कर्ज वाटप झाले आहे.
1 लाख शेतक:यांनी घेतले कजर्
 जिह्यात जिल्हा बॅँक, राष्ट्रीयकृत व खाजगी बॅँकांनी मिळून 112 कोटी 14 लाखाचे कर्ज केले वाटप केले. जिल्ह्यात आतार्पयत कर्ज घेणा:या शेतक:यांची संख्या 1 लाख 1 हजार 643 आहे. कर्ज वाटपात या वर्षी जिल्हा बॅँकेपेक्षा राष्ट्रीयकृत बॅँकांची आघाडी घेतली असून त्यांनी 627 कोटींचे कर्ज आतार्पयत वाटप केले आहे.

Web Title: Peak loan to one lakh farmers in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.