मामलेदार न्यायालयात हाणामारी करणाऱ्या पक्षकारांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:13 AM2021-06-22T04:13:05+5:302021-06-22T04:13:05+5:30

गहूखेडा शिवारातील मनोहर रामदास पाटील यांनी त्यांचे शेत युवराज तुळशीराम पाटील ( ह.मु. भोपाल, रा. रणगाव, ता. रावेर) व ...

Penalties to the parties involved in the litigation court | मामलेदार न्यायालयात हाणामारी करणाऱ्या पक्षकारांना दंड

मामलेदार न्यायालयात हाणामारी करणाऱ्या पक्षकारांना दंड

Next

गहूखेडा शिवारातील मनोहर रामदास पाटील यांनी त्यांचे शेत युवराज तुळशीराम पाटील ( ह.मु. भोपाल, रा. रणगाव, ता. रावेर) व विजय सुपडू पाटील (रा. मस्कावद) यांना खरेदी विक्री केले आहे. तत्पूर्वी सदरील शेती हरकतदार मधुकर रघुनाथ पाटील रा. गहूखेडा हे उक्त्याने कसत असल्याने त्यांनी सदरच्या खरेदी व्यवहारावर रावेर मामलेदार यांच्या न्यायालयात हरकत दाखल केली आहे. सदर हरकतीवर निवासी नायब तहसीलदार वार यांच्या दालनात सुनावणी सुरू होती. दरम्यान, हरकतदार मधुकर रघुनाथ पाटील व खरेदीदार युवराज तुळशीराम पाटील यांच्यात वादावादी होऊन झटापटीत एकाचे थेट डोक्यावरील केस उपटून फेकल्याने मोठमोठ्याने आरडाओरडा झाल्याने एकच खळबळ उडाली. गुन्हा दाखल करून दोघांना रावेर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्या आनंद बाजड यांनी दोन्ही पक्षकारांना प्रत्येकी १ हजार २०० रुपये दंड ठोठावला.

Web Title: Penalties to the parties involved in the litigation court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.