वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई
By admin | Published: February 13, 2017 12:39 AM2017-02-13T00:39:38+5:302017-02-13T00:39:38+5:30
जामनेर : विचित्र नंबर प्लेट, ट्रिपल सीट चालविणा:यांविरुद्ध मोहीम, प्रत्येकी दोन हजार रुपये दंड
जामनेर : शहरातील बेशिस्त वाहतूक, विचित्र नंबर प्लेट, ट्रिपल सीट आदी प्रकारांविरोधात पोलीस निरीक्षक नजीर शेख यांच्या नेतृत्वाखाली धडक मोहीम राबविण्यात आली. यात 30 दुचाकीचालकांकडून दंड वसूल करण्यात आला.
या वेळी प्रत्येक प्रमुख रस्त्यांवर पोलीस कर्मचारी थांबून त्यांनी दुचाकीस्वारांच्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यात वाहनांची कागदपत्रे, परवाना आदींची पाहणी जागच्या जागी केली. शिवाय विचित्रपणे नंबर टाकणे, दुचाकीवर ट्रिपल सीट बसवून भरधावपणे गाडी दामटणे आदींसाठीही दंडात्मक कारवाई करण्यात आली. जवळपास 30 च्या वर दुचाकीस्वारांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
कारवाईमध्ये सातत्य आवश्यक
शहरात व परिसरामध्ये वाहनचालक, मालकांकडून वेळोवेळी वाहतुकीच्या नियमांना केराची टोपली दाखविण्यात येते. त्यामुळे अनेकदा वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. रस्त्यांवर वाहने लावण्याचे प्रकार तर नेहमीच पाहायला मिळतात. त्याचा अनेकांना त्रास सहन करावा लागतो. या कारवाईत पोलिसांनी सातत्य दाखविले तर वाहतूक नियमांची पायमल्ली करण्यास कोणीही धजावणार नाही. रविवारी करण्यात आलेल्या कारवाईत पोलीस पथकामध्ये वाहतूक पोलिसांसह उपनिरीक्षक कैलास वाघ, बारकू ङिांगा जाने, विशाल पाटील, गोपाळ जाधव, जवानसिंग राजपूत आदी पोलीस कर्मचारी सहभागी झाले. दरम्यान, पोलिसांनी सुरू केलेल्या या मोहिमेचे शहरात स्वागत होऊ लागले आहे. (वार्ताहर)
पोलिसांनी विचित्र नंबर प्लेट, ट्रिपल सीट यांच्याविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेमुळे दुचाकीस्वारांमध्ये खळबळ उडालेली आहे. अनेकांनी पोलिसांना बघून दुस:या रस्त्याने जाणे पसंत केले.
4शहरात भरधाव वेगाने दुचाकी चालविणा:यांचेही प्रमाण वाढलेले आहे. यामुळे वृद्ध, स्त्रिया यांना जीव मुठीत घेऊनच चालावे लागते. भरधाव वेगाने वाहने चालविणा:यांविरुद्ध अशीच कारवाईची मागणी होऊ लागली आहे.