10 ग्राहकांवर 2 लाखांची दंडात्मक कारवाई
By admin | Published: April 18, 2017 12:43 AM2017-04-18T00:43:53+5:302017-04-18T00:43:53+5:30
शेंदुर्णी : वीज मंडळाच्या अधिका:यांचे धाडसत्र
शेंदुर्णी, ता.जामनेर : येथे सोमवारी वीज मंडळाच्या अधिका:यांनी धाडसत्र राबवित अनधिकृतपणे वीज वापरणा:या 10 जणांवर कारवाई करीत दोन लाखांचा दंड ठोठावला. या कारवाईमुळे वीजचोरी करणा:यांचे धाबे दणाणले आहे.
सोमवारी अचानक वीज मंडळाचे पथक शेंदुर्णीमध्ये दाखल झाले. यात उपकार्यकारी अभियंता व्ही.डी. सोनवणे (पहूर विभाग) यांच्या नेतृत्वात सहायक अभियंता एन.एम.चौधरी, एच.एफ.पाटील, एच.एम. जाधव, बी.एस. खडके आदिंच्या उपस्थितीत तसेच वीज मंडळाचे अधिकारी व कर्मचा:यांनी ही कारवाई केली.
या कर्मचा:यांनी गावातील विविध भागात थेट जाऊन भरदुपारी कारवाईचा धडाका लावत वीज चोरी करणारे व अनधिकृत वीज वापरणा:या दहा ग्राहकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून जवळपास 2 लाखांर्पयत दंडाची रक्कम वसुलीची कारवाई केली. अचानक आलेल्या पथकाच्या धाडसत्राने शहरातील वीजचोरी करणा:यांची एकच धावपळ सुरू झाली होती. त्यांनी तारांवर टाकलेले आकडे काढण्यासाठी एकच घाई केली. दरम्यान, वीजचोरी रोखण्यासाठी हे पथक शेंदुर्णी तसेच परिसरातील गावात फिरून दंडात्मक कारवाई करीतच राहणार असल्याचे अधिका:यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
(वार्ताहर)