कर्मचारी ओळखपत्र व विनामास्क आढळल्यास दंड आकारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:19 AM2021-02-25T04:19:43+5:302021-02-25T04:19:43+5:30
पत्रात म्हटले आहे की, जिल्हा परिषदेमधील अनेक कर्मचारी ओळखपत्राचा वापर करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. कार्यालयीन वेळेत ...
पत्रात म्हटले आहे की, जिल्हा परिषदेमधील अनेक कर्मचारी ओळखपत्राचा वापर करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. कार्यालयीन वेळेत त्यांनी ओळखपत्र लावून, कार्यालयात येणे बंधनकारक आहे. त्यामुळे संबंधित विभागप्रमुखांनी तत्काळ याची अंमलबजावणी करावी, तसेच वारंवार सूचना देऊनही अनेक कर्मचारी विनामास्कही फिरत असल्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर ५०० रुपये दंडाची कारवाई करावी व ओळखपत्र नसणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही ५०० रूपये दंडाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कामानिमित्त बाहेरून येणारे नागरिकही विनामास्क आढळल्यास त्यांच्यावरही दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत. सीईओंच्या या आदेशानंतर बुधवारी सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन, त्यांना ओळखपत्र लावून व मास्कचा वापर करण्याच्या सक्त सूचना केल्या. दरम्यान, कोरोनाच्या पार्शभूमीवर जिल्हा परिषदेच्या नव्या व जुन्या इमारतीचे मुख्य दरवाजे बंद करुन एकच मार्ग वापरण्यासाठी खुला ठेवला आहे. तर या ठिकाणी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, नागरिकांना कामाबाबत चौकशी करूनच इमारतीत सोडण्यात येत आहे.