रेल्वेतर्फे पेंशन अदालतीचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:12 AM2021-06-23T04:12:10+5:302021-06-23T04:12:10+5:30
मराठी प्रतिष्ठानतर्फे ५०० फळझाडे लावण्यात येणार जळगाव : शहरातील मराठी प्रतिष्ठानतर्फे `चला रानमेवा चाखु या` या उपक्रमा अंतर्गंत मेहरूण ...
मराठी प्रतिष्ठानतर्फे ५०० फळझाडे लावण्यात येणार
जळगाव : शहरातील मराठी प्रतिष्ठानतर्फे `चला रानमेवा चाखु या` या उपक्रमा अंतर्गंत मेहरूण तलाव परिसरात मेहरूणची गोड बोरे, रामफळ, सिताफळ, माळबेरी, खिरणी, करवंद आदी प्रकारच्या ५०० फळझाडांची लागवड करण्यात येणार आहे. ४ जुलै रोजी सकाळी १० वाजता वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार असून, रोपांची लागवड करण्यासाठी खड्डेही खोदण्यात आली आहेत. तरी जळगावकरांनी या कार्यक्रमावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमिल देशपांडे, सचिव विजय वाणी व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
अनियमित बससेवेमुळे प्रवाशांचा संताप
जळगाव : तालुक्यातील सामनेर येथून जळगावला येण्यासाठी दुपारी पावणे तीन ते चारच्या दरम्यान पाचोऱ्याहून जळगावकडे येण्यासाठी महामंडळाची एकही बस वेळापत्रकाप्रमाणे न आल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. विशेष म्हणजे बसमध्ये सवलत असलेल्या वयोवृद्ध प्रवाशांना बसची वाट पाहत थांब्यावरच ताटकळत बसावे लागले. जळगावहून पाचोऱ्याकडे तीन बस रवाना झाल्या असतांना, पाचोरा आगारातून जळगावसाठी एकही बस न सोडण्यात आल्याने, नागरिकांनी महामंडळाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला.
तांत्रिक कामांमुळे गाड्यांना विलंब
जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे जळगाव ते मनमाड दरम्यान विविध ठिकाणी तांत्रिक कामे होती घेण्यात आली आहेत. त्यामुळे कामाच्या ठिकाणी गाड्या संथ गतीने तर काही ठिकाणी या गाड्या मध्येच थांबविण्यात येत आहेत. यामुळे गाड्यांना विलंब होत असून, परिणामी प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने हे काम तातडीने करण्याची मागणी प्रवाशांमधुन केली जात आहे.
बाहेरील वाहनांमुळे स्थानकात कोंडी
जळगाव : नातलगांना सोडण्यासाठी काही वाहनधारक थेट आपले चारचाकी वाहन थेट बस स्थानकात नेत असल्यामुळे, स्थानकातील बसेसला बाहेर पडण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे स्थानकात बस व्यक्तीरिक्त इतर वाहन नेण्यास बंदी असतानांही, अनेक नागरिक नियमांचे उल्लघंन करून थेट वाहने स्थानकात नेत आहेत. तरी आगार प्रशासनाने या बेशिस्त वाहन धारकांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांमधुन केली जात आहे.