अंत्यदर्शनासाठी जनसागर

By admin | Published: February 27, 2016 01:04 AM2016-02-27T01:04:48+5:302016-02-27T01:04:48+5:30

शोक अनावर : पावले जैन हिल्सकडे वळली; भावनांचा बांध फुटला

People to be entertained | अंत्यदर्शनासाठी जनसागर

अंत्यदर्शनासाठी जनसागर

Next

जळगाव : ठिबक सिंचनाची क्रांती घडविणारे, लाखो कुटुंबांचे पोशिंदा तथा जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत भवरलाल जैन यांच्या अंत्यदर्शनासाठी शुक्रवारी सकाळपासूनच देश-विदेशातील चाहत्यांची रीघ लागली व दिवसभर जनसागर लोटला. भाऊंच्या निधनाने शोकसागरात बुडालेल्या तमाम जळगाववासीयांसह राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची पावले आपसूकच आपल्या लाडक्या कर्मयोग्याच्या अंत्यदर्शनासाठी जैन हिल्सकडे वळली आणि सर्वाच्या भावनांचा बांध फुटला.

भवरलाल जैन यांचे गुरुवारी निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी आठ वाजेपासून ते रात्री आठ वाजेर्पयत जैन हिल्स येथील आकाश मैदानावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

दररोज येथे वावर असणा:या भाऊंचा आता हा अखेरचा सहवास असल्याने जैन हिल्स सुन्न व नि:शब्दझाल्याचा अनुभव येत होता. आकाशमैदानावर चाहत्यांची मोठी रीघ लागली. सर्व जण रांगेत व शिस्तबद्ध पद्धतीने अंत्यदर्शन घेत होते.

दर्शनासाठी मोठी रीघ..

भवरलाल जैन यांच्या सान्निध्यात जे जे सहकारी आले ते ते सहकारी आपल्या या लाडक्या नेतृत्वाच्या दर्शनासाठी आतुर झाले होते. ज्या वेळी भवरलाल जैन यांचे पार्थिव एका शीतपेटीमध्ये भव्य शामियानात ठेवण्यात आले तेव्हा

जनसागर लोटला..

सकाळी आठ वाजेपासून सुरू झालेल्या अंत्यदर्शनासाठी हळूहळू गर्दी वाढत जाऊन दिवसभर जनसागर लोटला

शनिवारी अंत्यसंस्कार..

भवरलाल जैन यांचे पार्थिव शनिवारी सकाळी आठ ते 11 या वेळेत पुन्हा अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येऊन दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्यात येणार असल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली.

सर्वाना शोक अनावर..

जैन हिल्स येथे अंत्यदर्शनप्रसंगी जैन कुटुंबासह येणा:या सर्वाना येथे शोक अनावर झाला होता. आता या हजारोंच्या पोशिंद्याचे पुन्हा दर्शन होणार नाही, या भावनेने सर्वजण शोक व्यक्त करीत होते.

राजेंद्र दर्डा यांच्याकडून जैन परिवाराचे सांत्वन..

लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांनी भवरलाल जैन यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करीत अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी अशोक जैन यांच्यासह जैन कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच भवरलाल जैन यांचे मित्र तथा कविवर्य ना.धों. महानोर, डॉ.सुभाष चौधरी यांचीही भेट घेऊन भाऊंबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.

Web Title: People to be entertained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.