अतिक्रमण पथकाला नागरिकांनी घेरले

By Admin | Published: February 4, 2017 12:47 AM2017-02-04T00:47:53+5:302017-02-04T00:47:53+5:30

गुन्हे दाखल करणार : पिंप्राळा हुडकोत कारवाई न करता पथक माघारी परतले

People encircled the encroachment team | अतिक्रमण पथकाला नागरिकांनी घेरले

अतिक्रमण पथकाला नागरिकांनी घेरले

googlenewsNext

जळगाव : रहिवासासाठी दिलेली जागा व्यवसायासाठी वापरणे, ज्या व्यक्तीच्या नावाने जागा दिली तो न रहाता दुस:याच व्यक्तीने तेथे व्यवसाय सुरू केला  असल्याचा प्रकार पिंप्राळा हुडकोत आढळून आल्याने तेथे कारवाईसाठी गेलेल्या मनपा अतिक्रमण विभागाच्या पथकास नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागले. तणाव निर्माण झाल्याने वाद वाढू नये म्हणून कारवाई पथकाने तेथून काढता पाय घेतला. दरम्यान, लवकरच सर्व तपासण्या करून या भागात कारवाई प्रस्तावित असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दूध फेडरेशन येथील झोपडपट्टीधारकांना तात्पुरत्या निवासासाठी पिंप्राळा हुडकोनजीक असलेल्या सुमारे 20 हजार स्केअर        फुटाच्या खुल्या भुखंडावर जागा देण्यात आली आहे. जवळपास 20 जणांना ही जागा रहिवासासाठी देण्यात आली होती. मात्र तेथे व्यवसाय सुरू केला असल्याचे मनपा अतिक्रमण विभागाच्या पथकाच्या लक्षात आले.  त्यावरून या ठिकाणी हे पथक अतिक्रमण विभागाचे अधीक्षक एच.एम.खान यांच्या मार्गदर्शनाखाली गेले होते.
 20 जणांना पत्राची मागणी केली असता त्यातील काही जणांनी आरडाओरड सुरू केला.  मनपा पथक कारवाई करेल असे पाहून या ठिकाणी 200 ते 300 जणांचा जमाव एकत्र आला. आरडाओरड सुरू होऊन तणाव निर्माण झाल्याने मनपा पथकाने या ठिकाणाहून काढता पाय घेतला.
गुन्हे दाखल करणार
आता याप्रश्नी पोलीस बंदोबस्त घेऊन कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. संबंधीतांना दिलेल्या पत्राची तपासणी करून एकाच्या नावावरील जागा दुसराच वापरत असल्यास संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचे अतिक्रमण विभागाचे अधीक्षक एच.एम. खान यांनी सांगितले. यासाठी विधी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाणार असल्याचेही ते  म्हणाले. 

खंडेरावनगरात अतिक्रमणावर हातोडा
खंडेराव नगरातील नाल्यानजीक असलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण शुक्रवारी दुपारी मनपा अतिक्रमण विभागाच्या पथकाने काढले. या परिसरातील नागरिकांनी   आयुक्त जीवन सोनवणे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत तक्रार केली होती. आयुक्तांनी याप्रश्नी दोन दिवसात कारवाईचे आदेश दिले होते. या भागातील एका नागरिकाने भर रस्त्यात 10 ते 15 फुट पुढे येऊन झाडे लावली व त्याआड पत्र्याचे शेड बांधले होते. तक्रारीची दखल घेऊन बुलडोझर लावून हे अतिक्रमण शुक्रवारी दुपारी काढण्यात आले व रस्ता मोकळा करण्यात आला.

पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली वसुली
पिंप्राळा हुडकोत नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेत, त्यांना घरे मिळतील असे दाखवून पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली 190 रूपयांची वसूली केली जात असल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी नागरिकांच्या सतर्कतेने उघडकीस आला आह़े वसुली करणा:या महिलेसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून कॉप्म्युटरसह त्यांचे साहित्य जप्त केले आह़े दरम्यान महापालिकेने दोघे आमचे कर्मचारी नसल्याचे सांगितल्याने वसूली करणारे नेमके कोण असा प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांची चौकशी सुरू आह़े याबाबत माहिती मिळताच जाकीर पठाण यांनी महापालिकेतील अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून प्रकार कळविला़ मात्र अधिका:यांकडून योजनेबाबत कुठलेही सव्रेक्षण सुरू नसून महापालिकेचे कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले नसल्याचे सांगितल़े एका वेल्डींगच्या दुकानात तिघांनी लॅपटॉपसह दुकान मांडल़े
तिघे पोलिसांच्या स्वाधीन
फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात आल्यावर सर्व नागरिकांनी गर्दी केली व महिलेसह दोघांना घेरल़े माहिती मिळताच रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठल़े तिघांना सोबत घेत पोलीस ठाण्यात आणल़े नगरसेवक सुरेश सोनवणे, जाकीर पठाण यांच्यासह नागरिकांनी गर्दी केली़
अर्ज भरलेल्या नागरिकांची गर्दी
फसवणूकीच्या प्रकार असल्याचे समजताच पिंप्राळा हुडकोतील अर्ज भरून देणा:या नागरिकांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गर्दी केली़ याप्रकरणी उशीरार्पयत पोलिसांची चौकशी सुरू होती़
 

Web Title: People encircled the encroachment team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.