लोक न्यायालयात बसली तुटलेल्या संसाराची घडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:19 AM2021-09-26T04:19:54+5:302021-09-26T04:19:54+5:30
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशाने शनिवारी जिल्ह्यातील सर्व तालुका व जिल्हा सत्र न्यायालयात लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. ...
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशाने शनिवारी जिल्ह्यातील सर्व तालुका व जिल्हा सत्र न्यायालयात लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी.जगमलाणी यांच्याहस्ते उद्घाटन झाले. कौटुंबिक वादाच्या प्रकरणात पती अकोला येथे रेल्वेत असून पत्नी जळगावातील पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी आहे. दोघांना अपत्य आहेत. हे प्रकरण अतिशय भावनिक पध्दतीने हाताळण्यात आले. पती-पत्नीच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून न्यायाधीश जगमलाणी यांनी त्यांचा सत्कार करण्यासह प्रोत्साहनपर पारितोषिकही दिले.
यावेळी प्राधिकरणाचे सचिव ए.ए.के.शेख, वकील संघाचे अध्यक्ष ॲड.दिलीप बोरसे, उपाध्यक्ष प्रभाकर पाटील, सचिव दर्शन देशमुख, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके उपस्थित होते. पॅनल प्रमुख म्हणून न्या.आर.एन.हिवसे, न्या.डि.वाय.काळे, न्या.एस.एन.फड, न्या.एस.पी.सैय्यद, न्या.आर.वाय.खंडारे, न्या.ए.एस.शेख तर पॅनल विधीज्ञ म्हणून ॲड.अर्चना कारवा,ॲड.वैशाली सूर्यवंशी, ॲड.मंजुळा मुंदडा, ॲड.विवेक पाटील, ॲड.राहूल अकुलकर, ॲड.अजय पाटील, ॲड.आर.टी.बाविस्कर, ॲड.विजय शिंदे, ॲड.लीना म्हसके, ईस्माईल पटेल व धीरज पांडे होते. प्राधिकरणाचे अधीक्षक रवींद्र ठाकूर, अविनाश कुळकर्णी, प्रमोद पाटील, गणेश निंबाळकर, चंद्रवंदन भारंबे, आरिफ पटेल व जावेद पटेल यांनी लोकन्यायालय यशस्वी केले.
मृत्यूनंतर वारसांना मिळाली नुकसान भरपाई
अपघातात जखमी व त्यानंतर झालेल्या मृत्यू प्रकरणात काही जणांना नुकसान भरपाई देण्यात आली. त्यात विजया रामचंद्र बिराई (रा.बडोदा) यांच्या वारसांना २ लाख ३० हजार, अविनाश गुलाब वानखेडे (रा.पातोंडे, ता.अमळनेर) यांच्या पत्नी अपघातात ठार झाल्या होत्या. त्यांना १० लाख ५० हजार, पिंप्राळा येथील रजूबाई बाबुराव हटकर यांचे पती अपघातात ठार झाले होते, त्यांच्या वारसाला ४ लाख ५० हजार, चाळीसगाव येथील छबुबाई भालचंद्र चव्हाण यांच्या प्रकरणात कोरोनामुळे वारसाचा व्हिडीओकॉन्फरन्सद्वारे जबाब घेण्यात आला. त्यांना ६ लाख ५० हजार, मोतीलाल पंडीत यांचा पारोळा हद्दीत अपघात झाला होता तर सुरत येथे मृत्यू झाला होता, त्यांच्या वारसाला देखील ९ लाख ९० हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळाली.