व्यापाऱ्यांवर होणा-या अन्यायाकडे लोकप्रतिनिधींचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:16 PM2019-06-28T12:16:08+5:302019-06-28T12:17:01+5:30

कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापाऱ्यांचा आरोप

People's representatives are concerned about the misunderstanding on merchants | व्यापाऱ्यांवर होणा-या अन्यायाकडे लोकप्रतिनिधींचा कानाडोळा

व्यापाऱ्यांवर होणा-या अन्यायाकडे लोकप्रतिनिधींचा कानाडोळा

Next

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीची पाडलेली भिंत पुन्हा बांधून दिली जात नसल्याने व्यापाºयांनी पुकारलेल्या बंदमुळे मोठे नुकसान होत असले तरी व दबाबतंत्रामुळे होत असलेल्या अन्यायाकडे लोकप्रतिनिधी कानाडोळा करीत आहे, असा आरोप व्यापाºयांनी केला आहे. या बंदमुळे दररोज करोडो रुपयांची उलाढाल ठप्प होऊन शेतकºयांचेही नुकसान होत असल्याने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
परवानगी नसताना व्यापारी संकुलासाठी कृषी उत्त्पन्न बाजार समितीची तीनशे मीटर भिंत पाडण्यात आल्यानंतर व्यापाºयांनी बंद पुकारला. त्यानंतर भिंत बांधून देण्याचे आश्वासन मिळाल्याने व्यापाºयांनी बंद मागे घेतला. मात्र आश्वासनानुसार काम सुरू होत नसल्याने जळगाव मार्केट यार्ड आडत असोसिएशनने पुन्हा १७ जूनपासून बेमुदत बंद पुकारला आहे़ आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने व्यापाºयांनी लोकप्रतिनीधींना निवेदन देऊन हा प्रश्न मार्गी लागवण्याची मागणी केली. मात्र बंदला १० दिवस झाले तरी त्याकडे कानाडोळाच होत असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे.
दबावामुळे मोजक्या मंडळींसाठी शेकडो जण वेठीस
या प्रकरणात काही मोजक्या मंडळींसाठी शेकडो व्यापाºयांना वेठीस धरले जात असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. भिंत बांधून देण्याची मागणी असली तरी राजकीय दबावतंत्राचा वापर करून विकासकाला झुकते माप दिले जात असल्याचेही व्यापाºयांचे म्हणणे आहे. त्यामुळे व्यापाºयांसह शेतकरीही वेठीस धरले जात असल्याचा सूर आहे.
निवडणुकांवर डोळा
पुढे विधानसभा निवडणुका असल्याने व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ग्रामीण भागातील अधिकाधिक संचालक असल्याने त्यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी जात नसल्याचा आरोप केला जात आहे. या संचालकांच्या विरोधात भूमिका घेतल्यास निवडणुकीवेळी परिणाम होऊ शकतो, अशी भीती असल्याने निवडणुकांवर डोळा ठेवून काहीही हालचाली होत नसल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे.
सहकार राज्यमंत्री संचालकांचे नेते
सहकार खात्याशी निगडीत हा विषय असला तरी व सहकार राज्यमंत्रीही जिल्ह्यातीलच असले तरी तेच संचालक मंडळाचे नेते असल्याने संचालकांना ते नाराज करू शकत नसल्याचा सूर व्यापाºयांमध्ये आहे.
सर्व नियमानुसार होईल
या विषयी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व आमदार सुरेश भोळे यांना त्यांच्या भूमिकेविषयी विचारले असता सर्व नियमानुसार होईल, असे दोघांचेही म्हणणे आहे. यात हा विषय पणन संचालकांकडे पोहचल्याने जो निर्णय येईल, त्यानुसार काम होईल, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तर परवानगी देण्याबाबत अधिकार मनपा आयुक्तांना असल्याने त्यात आपण हस्तक्षेप करीत नाही. भिंत बांधण्याविषयी निर्णय नियमानुसारच होईल, असेही आमदार भोळे म्हणाले.
दहाव्या दिवशीही बंद कायम
बाजार समितीतील व्यापाºयांनी पुकारलेला बंद दहाव्या दिवशीही कायम होता. त्यामुळे येथील सर्व व्यवहार ठप्पच होते.

हा विषय पणन महासंघाच्या संचालकांकडे पोहचला असून त्यांच्याकडून जो निर्णय येईल, त्यानुसार काम होईल. व्यापाºयांनी आपल्या मागण्यांसाठी शेतकºयांना वेठीस धरणे योग्य नाही.
- गुलाबराव पाटील, सहकार राज्यमंत्री

बाजार समितीमधील कामांना परवानगी देण्याचे अधिकार मनपा आयुक्तांना असून त्यात आपण हस्तक्षेप करीत नाही. भिंत बांधण्याबाबत काय करायचे हे कृषी उत्पन्न बाजार समितीने ठरवावे. नियमाला सोडून कोणतेच काम होणार नाही.
- सुरेश भोळे, आमदार.

Web Title: People's representatives are concerned about the misunderstanding on merchants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव