एरंडोल तालुक्यात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा टक्का वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:12 AM2021-07-24T04:12:41+5:302021-07-24T04:12:41+5:30

तालुक्यातील ग्रामीण भागातील इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत असून ऑनलाइन शिक्षणाला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना आता शाळेची ओढ लागली ...

The percentage of student attendance increased in Erandol taluka | एरंडोल तालुक्यात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा टक्का वाढला

एरंडोल तालुक्यात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा टक्का वाढला

Next

तालुक्यातील ग्रामीण भागातील इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत असून ऑनलाइन शिक्षणाला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना आता शाळेची ओढ लागली आहे. २३ रोजी विद्यार्थ्यांची उपस्थिती ४४ टक्क्यापर्यंत पोहोचली आहे. तालुक्यातील आठवी ते बारावीच्या शाळांची संख्या २८ असून एकूण विद्यार्थी संख्या ५,४४८ पैकी शुक्रवारी दोन हजार ३७२ विद्यार्थी शाळेला उपस्थित होते.

एरंडोल तालुक्यात २८८५ पालकांचे संमती पत्र शाळांना प्राप्त झाले आहे. पैकी पंचवीस शाळा सुरू करण्याबाबत ग्रामपंचायतीकडून ठराव मिळाले आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी व्ही. एच. पाटील यांनी दिली आहे.

माध्यमिक विद्यालय निपाणे प्रियदर्शनी माध्यमिक विद्यालय जळू या दोन्ही शाळांचे ठराव ग्रामपंचायतीकडून अजूनही देण्यात आलेले नाही. जळू येथे विद्यार्थ्यांचे संमतीपत्र घेऊन शाळा सुरू करण्यात आली आहे तर निपाणे येथे विद्यार्थ्यांची उपस्थिती नाही तसेच सोनबर्डी आश्रमशाळेचे आदिवासी विभागाचे स्वतंत्र पत्र मिळाल्यानंतर कार्यवाही सुरू होईल असे सांगण्यात आले.

Web Title: The percentage of student attendance increased in Erandol taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.