प्राध्यापक निवडीचे अधिकार संस्थाचालकांकडे कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2017 12:31 AM2017-04-11T00:31:04+5:302017-04-11T00:31:04+5:30
निर्णय : विद्यापीठ कायद्यात केंद्रीय भरती मंडळाची तरतूद नाही
जळगाव : नवीन विद्यापीठ कायदा राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये 1 मार्च रोजी लागू झाला. या कायद्यात विद्यार्थी हित लक्षात ठेवून अनेक बदल करण्यात आले असले तरी प्राध्यापकांच्या निवड प्रक्रियेचे अधिकार संस्थाचालकांकडेच ठेवण्यात आले आहे. याबाबत तरतुदी करताना राज्य शासनाने संस्थाचालकांचे हित साधले असल्याची शिक्षण क्षेत्रात चर्चा आहे. त्यामुळे प्राध्यापक संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
नवीन विद्यापीठ कायदा लागू झाल्यानंतर प्राधिकरणांची निर्मिती, विद्याथ्र्याचा समावेश, चॉईस बेस क्रेडिट सिस्टिम, विद्यार्थी निवडणुका अशा नवीन तरतुदी करण्यात आल्या आहेत. मात्र प्राध्यापकांच्या निवडीबाबत राज्य शासनाने नवीन विद्यापीठात कोणतीही नवीन तरतूद न करता संस्थाचालकांकडेच प्राध्यापक निवडीचे अधिकार ठेवण्यात आले आहेत.