हुंड्यासाठी छळ; उच्चशिक्षीत तरुणीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 06:18 AM2022-03-27T06:18:02+5:302022-03-27T06:19:14+5:30

रामेश्वरी हिचे भूषण ज्ञानेश्वर पाटील ऊर्फ बारी याच्याशी लग्न ठरले होते

Persecution for dowry; Suicide of a young woman | हुंड्यासाठी छळ; उच्चशिक्षीत तरुणीची आत्महत्या

हुंड्यासाठी छळ; उच्चशिक्षीत तरुणीची आत्महत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लग्नाआधीच हुंड्याचे दागिने व पैशांसाठी होणारा छळ, तसेच होणाऱ्या पतीनेच जाड म्हणून हिणवले व लग्न मोडण्याची धमकी दिल्यामुळे रामेश्वरी रवींद्र नागपुरे (२४) या उच्चशिक्षित तरुणीने घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

रामेश्वरी हिचे भूषण ज्ञानेश्वर पाटील ऊर्फ बारी याच्याशी लग्न ठरले होते. ६ मार्च रोजी साखरपुडा झाला होता, तर १८ मे रोजी विवाह होणार होता. परंतु साखरपुडा होताच काही दिवसांनी भूषण व त्याच्या आईकडून दागिने, पैशांचा तगादा सुरू झाला. त्यानुसार दागिने व रोख रक्कम दिली. त्यानंतर पुन्हा भूषणकडून हिणवणे सुरू झाल्याने तिने हे पाऊल उचलले.

Web Title: Persecution for dowry; Suicide of a young woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.