माहेरून पैसे आणावे म्हणून दोघा विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:14 AM2021-07-25T04:14:54+5:302021-07-25T04:14:54+5:30
जळगाव : माहेरून एक लाख रुपये आणावे म्हणून विवाहितेचा मानसिक-शारीरिक छळ केल्याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात सासरच्यांविरुध्द गुन्हा दाखल ...
जळगाव : माहेरून एक लाख रुपये आणावे म्हणून विवाहितेचा मानसिक-शारीरिक छळ केल्याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात सासरच्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशाबाबा नगरातील माहेर असलेल्या मीनल यांचे पाचोऱ्यातील अमोल राजेंद्र महाजन यांच्याशी विवाह झाला आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून सासरच्या मंडळींकडून मीनल यांचा माहेरून पैसे आणावे म्हणून शारीरिक मानसिक छळ केला जात होता. अखेर या त्रासाला कंटाळून त्या माहेर आल्या. नंतर त्यांनी सासरच्यांविरुध्द तक्रार दिली असून त्यानुसार अमोल राजेंद्र महाजन, राजेंद्र रामचंद्र महाजन, जयश्री राजेंद्र महाजन, मुकेश राजेंद्र महाजन, परेश महाजन (सर्व रा. पाचाेरा) व चैताली महाजन (रा.नाशिक) तसेच सुनंदा महाजन (रा.जळगाव) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
००००००००००
फर्निचरसाठी पैसे आणावे म्हणून छळ
घरासाठी फर्निचर आणण्यासाठी माहेरून पैसे आणावे म्हणून एमआयडीसी येथील माहेर असलेल्या विवाहितेचा मानसिक-शारीरिक छळ केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ठाण्यातील सासरच्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसीतील माहेरवाशिणी रूपल यांचा ठाण्यातील राहुल वारुळे यांच्याशी सन २०१७ मध्ये विवाह झाला होता. मात्र, लग्नाच्या दोन महिन्यानंतरपासून सासरच्यांकडून घरातील फर्निचरसाठी माहेरून पैसे आणावे म्हणून छळ सुरू केला होता. अखेर या त्रासाला कंटाळून त्या माहेरी परतल्या. त्यानंतर शुक्रवारी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती राहुल वारुळे, सासू लता वारुळे, सासरे राजेश वारुळे, जेठाणी प्रांजली वारुळे, जेठ कमलेश वारुळे (सर्व रा. ठाणे) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.