‘त्या’ पं.स.तील कर्मचा:याला दिली समज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2017 03:56 PM2017-03-31T15:56:31+5:302017-03-31T15:56:31+5:30
जळगाव : पंचायत समितीमधील कर्मचारी आर.पी.देशमुख यांना प्रफुल्ल नरेंद्र पाटील या युवकास मारहाण केल्याच्या प्रकरणात प्रशासनातील अधिका:यांनी समज दिली आहे.
Next
जळगाव : पंचायत समितीमधील कर्मचारी आर.पी.देशमुख यांना प्रफुल्ल नरेंद्र पाटील या युवकास मारहाण केल्याच्या प्रकरणात प्रशासनातील अधिका:यांनी समज दिली आहे. देशमुख यांच्याकडून तीन दिवसात खुलासा मागविला असून, या खुलाशानंतर देशमुख यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
यातच देशमुख यांनी संबंधित युवकास बेदम मारहाण केली नाही. हा प्रकार पं.स.च्या आवारात घडलेला नाही. बाहेरील कुणी मुलांनीच प्रफुल्ल यास मारहाण केली असावी. पण जे प्रसिद्धी माध्यमातून वृत्त आले. त्या आधारे व ज्या मुलांनी पं.स.मध्ये तक्रार केली त्या आधारे देशमुख यांना नोटिस दिली आहे, असे गटविकास अधिकारी एस.पी.सोनवणे यांनी सांगितले.
मुलाचे नातेवाईक पं.स.त धडकले
पं.स.मध्ये घडलेल्या प्रकाराबाबत मारहाण झालेल्या प्रफुल्ल पाटील याचे काही नातेवाईक शुक्रवारी पं.स.मध्ये आले. त्यांनी प्रफुल्लवर उपचार करण्यासाठी जो खर्च लागेल त्याची मागणी केली. याबाबत आपण प्रफुल्लचे नातेवाईक व देशमुख यांची भेट घालून दिली. त्यांच्यात उपचारांच्या खर्चाबाबत काय चर्चा झाली, काय ठरले याची नेमकी माहिती नाही, पण त्यांनी खर्च मागितल्याचेही गटविकास अधिकारी सोनवणे यांनी सांगितले.