वैयक्तीक काळजी, वैयक्तीक लॉकडाऊन महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:16 AM2021-03-19T04:16:24+5:302021-03-19T04:16:24+5:30
कोरोनाची रुग्णसंख्या ही एका दिवसात आता एक हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. बुधवारी एका दिवसात ९९६ रुग्ण समोर आले आहेत. ...
कोरोनाची रुग्णसंख्या ही एका दिवसात आता एक हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. बुधवारी एका दिवसात ९९६ रुग्ण समोर आले आहेत. अत्यंत झपाट्याने हा संसर्ग होत आहे. मात्र, आता सर्वत्र लॉकडाऊन शक्य नाही, मात्र, गर्दी टाळण्यानेच संसर्गाचा फैलाव रोखता येईल हेही तेवढेच खरे. त्यामुळे नागरिकांनी वैयक्तीक पातळीवर काळजी घेतल्यास स्वत:सह दुसऱ्यांनाही आपण सुरक्षित ठेवू शकतो. विशेषत: तरूणांनी याची अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यात अन्य तालुक्यांच्या तुलनेत जळगाव शहरात सर्वाधिक संसर्ग वाढला आहे. येथील बाधितांचे प्रमाण एके दिवशी थेट ५२ टक्क्यांवर गेले होते. त्यामुळे या ठिकाणी काळजी घेणे अधिकच महत्त्वाचे ठरते. जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात तब्बल १४७ टक्क्यांनी संसर्ग वाढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कोरोनाचा संसर्ग अधिकच झपाट्याने होत असल्याचे विदारक चित्र आहे. अशा स्थितीत स्वत:ला सुरक्षीत ठेवण्यासाठी काय करावे तर मास्कचा नियमीत वापर, प्रत्येकाशी बोलताना दुरूनच संवाद, चेहऱ्याला हात लावण्या आधी तो स्वच्छ धुवूनच लावा, अशा साध्या सोप्या तीन गोष्टी डॉक्टर सांगतात. त्या पाळल्यास आपण स्वत:ला, कुटुंबाला आणि इतरांनाही सुरक्षीत ठेवू शकतो. वैयक्तीक लॉकडाऊन म्हणजे, अत्यावश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळा, बाहेर गेलाच तरी मास्क वापरा, गर्दीत जावूच नका, गेले तरी मास्क उतरवू नका, हात स्वच्छ धुवा... आरोग्य विभागाने सांगितलेले नियम पाळून जर आपण सुरक्षीत राहू शकतो, तर ते न पाळता उगाच निष्काळजीपणा करून स्वत:सह इतरांचे आरोग्य धोक्यात का टाकावे, असा विचार सर्वांनी केल्यास संसर्ग रोखता येणार आहे. अन्यथा परिस्थति अधिक गंभीर होणार आहे...