ग.स.बेकायदेशीर नोकरभरतीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 09:45 PM2019-07-17T21:45:29+5:302019-07-17T21:45:34+5:30
चोपडा : ग.स.सोसायटीत बेकायदेशीर नोकरभरतीबाबत औरंगाबाद खंडपीठात याचिका १५ जुलै रोजी दाखल करण्यात आली आहे. प्रगती गटाचे ...
चोपडा : ग.स.सोसायटीत बेकायदेशीर नोकरभरतीबाबत औरंगाबाद खंडपीठात याचिका १५ जुलै रोजी दाखल करण्यात आली आहे.
प्रगती गटाचे रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार चोपडा येथील योगेश सनेर, धनराज बडगे, विपीन पाटील (भडगाव), संदीप केदारे (यावल) यांनी सहकार आयुक्त,पुणे तसेच आयुक्त सहनिबंधक,नाशिक व जिल्हा उपनिबंधक, जळगाव यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार २६ एप्रिल २०१९ रोजी ग.स.नोकरभरती चौकशी अधिकारी म्हणून श्री.जी.एच.पाटील यांची नेमणूक केलीे. मात्र ग.स.चे व्यवस्थापक तथा कार्यकारी मंडळ चौकशीवेळी कोणतेही कागदपत्र उपलब्ध करून देत नाहीत. म्हणून प्रगती गटातील विपीन वसंतराव पाटील व संदीप सुधाकर केदारे यांनी उच्च न्यायालयात सनदशीर मार्गाने सभासदांना न्याय मिळण्यासाठी याचिका दाखल केली. त्याची प्रथम सुनावणी १८ जुलै रोजी होणार आहे, असे चोपडा येथील योगेश सनेर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.